मुंबई : मालाड येथे एका भरधाव वेगात आलेल्या वाहनाने समोरुन येणाऱ्या वाहनाला धडक दिली. या अपघातात समोर येणारे वाहन उलटून रस्त्याच्या कडेला पडले. सदर वाहनातील पोलीस दाम्पत्यापैकी महिला जखमी झाली. चालकाविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवदास फुटाणे (५३) मालवणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. रविवारी रात्री १० च्या सुमारास ते पत्नी राधिका फुटाणे (४६) यांच्यासह मालाड येथे खासगी वाहनातून जात होते. त्यावेळी एस. व्ही. रोडवरील शिवाजी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने ( एमएच ०२ जीएच २६७८) फुटाणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत फुटाणे यांचे वाहन उलटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात राधिका फुटाणे यांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी चालक अशफाक खान (२९) याच्याविरोधात मालाड पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८४, १८५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.