scorecardresearch

Premium

सांताक्रुझ येथे महिलेच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक

आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

woman murder at santacruz, police arrested 30 year old man
सांताक्रुझ येथे महिलेच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सांताक्रुझ येथे महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. पण वैद्यकीय अहवाल व तपासात महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मरियम बीबी (३३) असे मृत महिलेचे नाव असून ती लोटस इमारतीच्या बांधकाम ठिकाणावर राहत होती. तिच्यासोबत आरोपी शहाबुद्दीन नजरूल गाजी (३०) राहत होता. आरोपीने १८ सप्टेंबरला मरियमचे तोंड उशीने दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तो काहीही न सांगता तेथून निघून गेला. तात्काळ महिलेला कुपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली होती.

Boyfriend arrested, case, murdeing girlfriend, suspicion character kalyan
कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या; प्रियकरास अटक
Santacruz murder case
सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
son's cleverness exposes father's immoral relationship nagpur
मुलाच्या चतुराईने पित्याचे अनैतिक संबंध उघड; अखेर पोलिसांनी समुपदेशाने दोन्ही कुटुंबाची गाडी आणली रुळावर
Delhi Crime News
IRS ऑफिसर कसा बनला कर्करोगग्रस्त पत्नीचा खुनी? दिल्लीत महिला वकिलाच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?

हेही वाचा : विधानपरिषदेतील सेना आमदारांविरोधातील याचिका सुनावणीत संदिग्धता; ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा

पण संशयीतरित्या महिलेचा मृत्यू व त्यानंतर तिच्या सोबत राहणारा गाजी गायब झाल्यामुळे पोलिसांना हत्येचा संशय होता. वैद्यकीय तपासणीत महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून गाजीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In mumbai 30 year old man arrested in santacruz woman murder case mumbai print news css

First published on: 22-09-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×