मुंबईः मतदारराजाला मतदान केंद्रांवर नेण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कसरत करताना दिसत आहेत. विशेष करून वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडूनही मतदान केंद्रांवर वृद्ध, अपंगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करताना दिसत होते. यावेळी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मतदारसंघांमध्ये विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मदतान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत होते.

Delhi Assembly Election Results 2025
Delhi Election Video: आठवा वेतन आयोग, प्राप्तिकर घोषणा ते न झालेली युती; गिरीश कुबेर यांच्या शब्दांत ‘आप’च्या पराभवाची कारणमीमांसा!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीत अरविंद केजरीवाल पराभूत, मालीवाल यांची ‘द्रौपदी वस्त्रहरण’ पोस्ट चर्चेत
Delhi Election Result
Delhi Election : दिल्लीत ऑपरेशन लोटस? आपच्या १६ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर, केजरीवालांचा खळबळजनक आरोप
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

खासगी कंपनीतील नोकरदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अधूनमधून मतदारांची वर्दळ सुरू होती. मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र मिश्र मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी टॅक्सी व वाहनांचा वापर करण्यात येत होता. वरळीत वयोवृद्धांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वेगळ्या ई-बाईकचा महिला कार्यकर्त्या वापर करीत होत्या. तसेच वयोवृद्ध नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेताना ई-वाहनांचाही वापर होत होता. वरळी परिसरात महापालिकेच्या पर्यटन वाहनातूनही वयोवृद्ध मतदारांची मतदान केंद्रांपर्यंत ने-आण केली जात होती.

हे ही वाचा… मुंबईत मतदानाला सुरुवात; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता बेस्ट उपक्रमाच्या विशेष बसगाड्या, व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, ईको व्हॅन, टॅक्सी, अशी वाहने उपलब्ध करण्यात आली होती. ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांवर बस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय दिव्यांगांच्या संख्येनुसार टॅक्सी, इको व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. याशिवाय मतदान केंद्रात व्हील चेअरवरही वापर करण्यात येत होता.

Story img Loader