मुंबई : शहापूरच्या आदिवासी विभागातून शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाबाहेर ११ बालके शस्त्रक्रियेसाठी आली होती. मानेला जन्मजात गाठ असलेल्या बाळापासून ते हायड्रोसिल तसेच जीभ टाळूला चिकटलेल्या बाळांच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात विख्यात बालशल्य चिकित्सक डॉ. संजय ओक व त्यांच्या पथकाने एकापाठोपाठ एक या ११ बालकांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. निमित्त होते डॉ संजय ओक यांच्या वाढदिवसाचे.२४ नोव्हेंबर हा डॉ ओक यांचा वाढदिवस… खरतर त्याचदिवशी ६५ शस्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. मात्र महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित शस्त्रक्रिया १ डिसेंबरोजी पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. ठाणे जिल्हा रुग्णालयात १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून डॉ संजय ओक तसेच पालिकेच्या शिव रुग्णालयातील त्यांचे सहकारी डॉक्टर आणि ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह आवश्यक कर्मचारीवर्ग शस्त्रक्रिया करणार आहेत. रात्री साडेदहापर्यंत या शस्रक्रिया केल्या जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून ठाणे जिल्हा रुग्णालयात बालकांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येत असल्याचे डॉ संकेत कुलकर्णी यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मुरबाड,शहापूर,जव्हार,ठाणे तसेच नवी मुंबईतून या बालकांची निवड करण्यात आल्याचे डॉ कुलकर्णी म्हणाले.

केईएमचे अधिष्ठाता व पालिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक म्हणून १३ वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या विविध ग्रामीण रुग्णालयात तसेच इमेरीटस प्रोफेसर म्हणून पालिकेच्या शीव रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात. यासाठी ते फुटकी कवडीची कोणाकडून घेत नाहीत. केईएमचे अधिष्ठाता व महापालिका रुग्णालयांचे संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर डी.वाय.पाटील संस्थेत कुलगुरू म्हणून डॉ ओक यांनी काम पाहिले. तसेच प्रिन्स अलिखान हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. करोनाच्या काळात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ‘कोविड टास्क फोर्स’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अमूल्य म्हणावे लागेल. सध्या ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत असून केईएममधून निवृत्त झाल्यानंतर एकाही रविवारी सुट्टी न घेता डॉ संजय ओक हे आदिवासी भागातील तसेच गोरगरीब लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : विनयभंग प्रकरणी दाखल फौजदारी कारवाई रद्द, इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाला न्यायालयाचा दिलासा

आरोग्य विभागाच्या उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी येऊन स्वेच्छेने रुग्णसेवा करावी, असे आरोग्य विभागाचे धोरण आहे. तथापि फारच थोडे खाजगी तज्ज्ञ अशा प्रकारे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करतात. डॉ. ओक हे अशांपैकी एक असून गेली १३ वर्षे दर रविवारी शहापूर उपजिल्हा रुग्णालय, अलीबाग जिल्हा रुग्णालय, पनवेल रुग्णालय तसेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाऊन लहान मुलांवरील जटील शस्त्रक्रिया करतात. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत झालेल्या २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या शस्त्रक्रियांसाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमांतर्गत तेथील डॉक्टर आदिवासी क्षेत्रातील आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच आंगणवाड्यात जाऊन बालकांच्या आरोग्याची तपासणी केली. यात आढळलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेली काही वर्षे ओक सरांचा हा उपक्रम सुरु असून कर्करुग्णांसह ज्या मोठ्या शस्त्रक्रिया शहापूर व अलिबागआदी उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे शक्य नसते, अशा रुग्णांच्या शस्रक्रिया मुंबईत शीव तसेच अन्य मोठ्या रुग्णालयात डॉ ओक करतात, असेही डॉ संकेत कुलकर्णी यांनी सांगितले.

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात २४ नोव्हेबर रोजी ११ बालकांच्या शस्रक्रिया केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिव रुग्णालयात साधारण ३५ शस्रक्रिया डॉ ओक व टीमने केल्या. आता उद्या १ डिसेंबररोजी ६५ शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आज दिवसभरात सुमारे ८० ते ९० बालरुग्ण यासाठी दाखल करण्यात आले असून यात हायड्रोसिल, हार्निया, लघवीच्या जागेवरील त्रास, छोट्या गाठी,अॅपेंडिक्स, दुभंगलेले ओठ तसेच जॉईंट फिंगर म्हणजे चिकटलेली बोटे आदी प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.यासाठी डॉ ओक यांच्याबरोबर शीव रुग्णालयाचे डॉ पारस कोठारी, डॉ अभय गुप्ता, डॉ नम्रता कोठारी, डॉ यतीन खैरनार ,डॉ तुळशीदास मंगे, डॉ मनिष कोटवानी, डॉ शाहाजी देशमुख, डॉ मैत्रेयी सावे, डॉ आदिती दळवी, डॉ सुकन्या विंचुरकर, डॉ प्रतिक्षा जोशी, डॉ मुग्धा नायक तसेच ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉ एन. रोकडे व विनोद जोशी यांचा शस्त्रक्रियेत सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार यांनी रुग्णालयात रुग्ण तसेच नातेवाईकांची राहाण्या व जेवणासह सर्व व्यवस्था केली आहे.

हेही वाचा : वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण; खटला संथगतीने सुरू असल्याने आरोपीला जामीन

डॉ. ओक यांनी आतापर्यंत वैद्यकीय व सामाजिक विषयावर ५३ पुस्तके लिहिली असून वाढदिवसानिमित्त ६५ शस्रक्रिया करण्याच्या संकल्पनेविषयी विचारले असता, ते म्हणाले की,आदिवासी दुर्गम भागातील गोरगरीब लहान मुलांच्या शस्रक्रिया करणे हे मी झाले कर्तव्य मानतो. परमेश्वराने बालशल्यचिकित्सकाचे कौशल्य मला दिले आहे ते केवळ पैसे कमाविण्यासाठी नाही. माझ्यापासून अन्य डॉक्टरांनी प्रेरणा घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करावी या हेतुने वाढदिवसानिमीत्त ६५ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १३ वर्षापूर्वी केईएममधून निवृत्त झाल्यापासून मी आठवड्यातील प्रत्येक रविवार आदिवासी दुर्गम भागातील गरीब लहान मुलांवर शस्त्रक्रिया करतो. अन्य खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना कदाचित एवढा वेळ देता येणार नाही, हे मान्य केले तरी महिन्यातून एखादा रविवार गरीब मुलांसाठी वा रुग्णांसाठी खाजगी प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांनी वेळ दिल्यास आदिवासी तसेच ग्रामीण दुर्गम भागातील लहान मुलांच्या वा मोठ्यांच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया लवकर होऊ शकतील. साधारणपणे वर्षाकाठी मी वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात जाऊन ७०० ते हजार शस्त्रक्रिया करतो. ज्या जटिल शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात करता येणे शक्य नसते, अशा शस्त्रक्रिया ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात केल्या जातात तर कर्करोगादी अन्य काही मोठ्या पालिकेच्या शीव रुग्णालयातही शस्त्रक्रिया करतो, असे डॉ. ओक यांनी सांगितले. वैद्यकीय समाजसेवेचा असा असाधारण वसा जपणारे डॉ ओक हे दुर्मिळ व्यक्तिमत्व असून त्यांच्यासारख्या व्यक्तीला खरतर स्वत:हून पद्मश्रीसारखे पुरस्कार द्यायला हवा, असे मत अनेक मान्यवर डॉक्टर व्यक्त करतात.

Story img Loader