मुंबईः रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी निवड करण्याचे आमिष दाखवून पाच उदयोन्मुख क्रिकेटपटुंची ६३ लाख रूपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. चिपळूण येथून व्यापारी संतोष चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईतील प्रशांत कांबळे आणि देवेश उपाध्याय यांच्याविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, चव्हाण काही मित्रांमार्फत २०१८ मध्ये कांबळे व उपाध्याय यांच्या संपर्कात आले. या दोघांनी आपली ओळख असल्याची बतावणी करून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी नवीन खेळाडूंची निवड करू शकतो, असे आमिष आरोपींनी चव्हाण यांना दाखवले होते. या दोघांवर विश्वास ठेवून चव्हाण यांनी अक्षय कामथ, रवींद्र पाटील, आकाश पाटील, राम कांबळे आणि विकास चौधरी या पाच उदयोन्मुख क्रिकेटपटुंना याबाबत सांगितले. त्यावेळी क्रिकेटपटुंनी रणजीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. चव्हाण यांनी त्यांच्याकडून एकूण ६३ लाख रुपये घेतले आणि जून २०१८ ते डिसेंबर २०२१ दरम्यान आरोपी कांबळे आणि उपाध्याय यांना दिले. मालाड (पश्चिम) येथील एका हॉटेलमध्ये ही रक्कम आरोपींना देण्यात आली, असे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी चव्हाण यांना रणजी स्पर्धेसाठी क्रिकेटपटुंच्या निवडीबाबतची काही कागदपत्रेही दाखवली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

हेही वाचा : मुंबई: जेसीबी चालकाकडून रेल्वे केबलचे नुकसान, दीड लाखांची भरपाई

मात्र, या पाचही तरूणांची निवडण झाली नाही. चव्हाण यांनी त्याबाबत दोघाना विचारले असता त्यांनी विविध कारणे देण्यास सुरूवात केली. चव्हाण यांनी दोघांकडे बराच पाठपुरावा केला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चव्हाण यांनी दोघांकडे पैसे मागण्यास सुरूवात केली. त्यावेळी आपला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनाटव कागदपत्रे तयार केल्याचेही निष्पन्न झाले अखेर चव्हाण यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा : मुंबई: दोन महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून ६३.६२ कोटी दंड वसूल

चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४२० (फसवणूक),४०६ (फौजदारी विश्वासघात), ४६५ (बनावट कायदपत्रे तयार करणे), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागपत्रे तयार करणे), ४७१ (बनावट इलेक्ट्रॉनिक दस्तावेज वापरणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला.