मुंबई : बेकायदेशीररीत्या निवारागृहात ठेवण्यात आलेल्या आपल्या हिंदू जोडीदाराची तेथून सुटका करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी एका मुस्लिम तरूणाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला धमक्या येत असून आमच्या दोघाच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणीही या तरूणाने याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे.

मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपल्या जोडीदाराला चेंबूर येथील स्त्री भिक्षेकरी खिकर केंद्र (शासकीय महिला वसतिगृह) येथे बेकायदेशीररीत्या ठेवले आहे. तिला अशा पद्धतीने तेथे ठेवणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. न्यायालयाने अशा प्रकारांना मज्जाव केला आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

High Court ordered Sakinaka police to protect inter-caste couple
कुटुंबाचा विरोध असलेल्या आंतरजातीय जोडप्याचे संरक्षण करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
High Court ordered fast tracking of Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्या आणि तो लवकरात लवकर निकाली काढा, उच्च न्यायालयाचे आदेश
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
Sessions Court District Judge R G Waghmare decisions on Durgadi fort
दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश
Chinmoy Das bail rejected
हिंदू नेते चिन्मय दास यांना जामीन देण्यास नकार, बांगलादेशातील चितगाव न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा : मुंबई : श्वासाची चिंता! शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे समाजमाध्यमांवर सवाल

आपल्या जोडीदाराने पालकांचे घर स्वेच्छेने सोडले होते आणि आपल्यासह ती सहमतीने लिव्ह-इन नातेसंबंधांत राहत होती. आपल्यासह अशा नातेसंबंधांत राहण्याचा निर्णय तिने जाणीवपूर्वक आणि कोणत्याही दबावाविना किंवा बळजबरीविना घेतला होता, असा दावा देखील याचिकाकर्त्याने केला आहे. याचिकाकर्त्याने याचिकेसह नोटरीकृत प्रतिज्ञापत्रही जोडले असून त्यात तरूणीने ती याचिकाकर्त्यासह पती-पत्नी म्हणून अनेक महिन्यांपासून स्वतःच्या इच्छेने आणि कोणत्याही बळजबरीशिवाय राहत असल्याचे म्हटले आहे. तरूणीने कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा ती कोणताही गुन्ह्यात सहभागी नाही. त्यामुळे, तिला अशाप्रकारे बंदिस्त ठेवणे तिच्या स्वातंत्र्याच्या, जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा : अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली, २७ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

आम्ही दोघे परस्परसहमतीने लिव्ह-इन नातेसंबंधात असल्याचे तरूणीने सांगूनही पोलिसांनी तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, तिला निवारागृहात बेकायदेशीररीत्या ठेवण्याचे पोलिसांची कृती मनमानी आणि सत्तेचा दुरूपयोग असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या तरूणीची एक चित्रफित देखील याचिकेसह न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्यात तरूणीने याचिकाकर्त्याशी कोणत्याही दबावाविना लग्न करण्याचा आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना दिसत आहे.

Story img Loader