मुंबई : मालाड (प.) येथील मढ, मार्वेला जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा बनलेले ३० वर्ष जुने सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय नुकतेच जमीनदोस्त करण्यात आले असून या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, पालिकेच्या पी उत्तर विभागाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार असून मढ मार्वेला जाणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांचे निधन

kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?
Panvel Municipal Corporation anti encroachment action
पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
90 percent work on second lane of Thane Creek Bridge-3 completed
नववर्षात पुणेमुंबई प्रवास सुसाट, ठाणे खाडी पूल तीनच्या दुसऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण
pune balajinagar metro station
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन
NITI Aayog plans to develop MMR into global hub
मुंबई महानगर लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब! म्हणजे काय होणार? आणखी कोणत्या शहरांना हा दर्जा?

मालाड पश्चिमेकडील मार्वे रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या पी उत्तर विभागाने हाती घेतला आहे. या मार्गावरील बांधकामे पालिकेच्या पी उत्तर विभागाने टप्प्याटप्प्याने हटवली आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बांधकामांमुळे या परिसरात कायम वाहतूक कोंडी होत असते. मढ मार्वेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमी पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने हाती घेतला होता. या रुंदीकरणाआड येणारी ७६ बांधकामे पहिल्या टप्प्यात पाडण्यात आली. रस्ता रुंदीकरणाआड येणारे एक ख्रिस्ती धर्मस्थळही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पाडून टाकण्यात आले. या मार्गावर असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयदेखील या प्रकल्पाच्या आड येत होते. मात्र नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून पालिकेच्या पी उत्तर कार्यालयाने हे कार्यालय नुकतेच पाडून टाकले. पोलीस विभागाशी समन्वय साधून हे कार्यालय हटवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी दोन जेसीबी, दोन डंपर, २० कामगार तैनात करण्यात आले होते.

सुमारे पाचशे चौरस फूटाचे बांधकाम असलेले हे कार्यालय ३० वर्ष जुने होते. या कार्यालयाला नवीन ठिकाणी बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

Story img Loader