‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्या असून त्याचा फायदा मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’ मार्गिकेलाही होऊ लागला आहे. ‘मेट्रो १’च्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. करोनाकाळानंतर पहिल्यांदाच ‘मेट्रो १’ची दैनंदिन प्रवासी संख्या चार लाखांवर गेली आहे.

मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळखली जाणारी अंदाजे ११ किमी लांबीची ‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. पहिल्यावहिल्या या मार्गिकेला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. काही वर्षातच या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढत गेली. टाळेबंदी लागेपर्यंत प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करीत होते. टाळेबंदीत तब्बल आठ महिने ‘मेट्रो १’ बंद होती. आठ महिन्यांनंतर ‘मेट्रो १’ सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र करोनाविषयक निर्बंध आणि ५० टक्के प्रवासी क्षमता यामुळे दैनंदिन प्रवासी संख्या हजारांवर आली. पुढे नियम शिथिल होत गेले आणि ‘मेट्रो १’वरील फेऱ्या वाढल्या. सेवा कालावधीही वाढला. परिणामी, प्रवासी संख्या वाढत गेली.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
CIDCO has extended Navi Mumbai Metro timings following passenger demand
प्रवाशांच्या मागणीनंतर सिडकोने नवी मुंबई मेट्रोची वेळ वाढवली
Central Railway, 8 percent Increase, 7 thousand crores, Passengers, Becomes Top, Passenger Transporting, Indian Railway, marathi news,
प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची ७,३११ कोटींची कमाई
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

हेह वाचा – मुंबई : शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, छोटी विमाने उडवण्यास मज्जाव

निर्बंध शिथिल झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या वाढली, मात्र करोनाकाळापूर्वीप्रमाणे प्रवासी संख्या साडेचार लाखांवर पोहोचू शकली नव्हती. आतापर्यंत ‘मेट्रो १’ची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे तीन लाख ८५ च्या आसपास होती. मात्र, मंगळवारी, २४ जानेवारी रोजी प्रवाशी संख्या थेट चार लाखांवर पोहोचल्याची माहिती एमएमओपीएलच्या प्रवक्त्यांनी दिली. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रवासी संख्या १५ हजाराने वाढली असून प्रामुख्याने डी. एन. नगर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानकावरील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या स्थानकांवरील प्रवासी संख्येत अनुक्रमे आठ हजार आणि सहा हजाराने वाढ झाली आहे.

हेही वाचा – मुंबई : परकीय चलनाचे आमिष दाखवून बनावट नोटा देणारी टोळी अटकेत

‘मेट्रो २ अ’वरील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक, ‘मेट्रो १’वरील डी. एन. नगर स्थानकाशी जोडले गेले आहे. त्यामुळे दहिसरच्या दिशेने येणाऱ्या मेट्रो प्रवाशांना वर्सोवा आणि घाटकोपरला जाणे सोपे झाले आहे. तर ‘मेट्रो ७’वरील गुंदवली स्थानक ‘मेट्रो १’वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकाशी जोडले गेले आहे. त्यामुळे दहिसर पूर्व येथून ‘मेट्रो ७’ने येणाऱ्यांना आता गुंदवलीला उतरून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वर्सोवा आणि घाटकोपरच्या दिशेने जाणे सोपे झाले आहे. एकूणच तीन मेट्रो मार्गिकांचे जाळे तयार झाले असून त्याचा फायदा ‘मेट्रो १’ला प्रवासी संख्या वाढीच्या रुपात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.