scorecardresearch

Premium

मुंबई : म्हाडा सोडतीचा सर्व्हर डाऊन, घराचा ताबा घेण्यासाठी आलेले विजेते हैराण

सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी जवळपास साडे चार ते पाच तास लागले. त्यामुळे विजेत्यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.

mumbai mhada lottery server down, mhada lottery winner server down
म्हाडा सोडतीचा सर्व्हर डाऊन, घराचा ताबा घेण्यासाठी आलेले विजेते हैराण (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया मुंबई मंडळाकडून सुरु आहे. त्यानुसार मंगळवारी आगाऊ वेळ घेऊन म्हाडात आलेल्या विजेत्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. दुपारी बारा वाजल्यापासून सोडतीच्या संगणकीय प्रणालीचे सर्व्हर डाऊन झाले. सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी जवळपास साडे चार ते पाच तास लागले. त्यामुळे विजेत्यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.

मुंबई मंडळाच्या ऑगस्ट २०२३ च्या सोडतीतील अंदाजे ३५०० विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठवित त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेतली जात आहे. तर जे घराची पूर्ण रक्कम भरत आहेत, मुद्रांक शुल्क, देखभाल खर्च आणि नोंदणी शुल्क भरत आहेत त्यांना ताबा देण्याचे काम सध्या सुरू आहे. ताबा पत्र घेण्यासाठी, यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आगाऊ वेळ घेत मिळालेल्या वेळेत आवश्यक त्या कागदपत्रांसह मुंबई मंडळाच्या पणन कार्यालयात उपस्थित राहत प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागत आहे. त्यानुसार मंगळवारी या प्रक्रियेसाठी आलेले विजेते हैराण झाले, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास संगणकीय प्रणाली काम करेनाशी झाली. त्यानंतर काम पूर्णतः ठप्प झाले. परिणामी ताबा घेण्यासाठी आलेल्या विजेत्यांना बसून रहावे लागले.

multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
Munawar Faruqui
मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे मोबाईलही चोरीला

हेही वाचा : आरोग्य विभागात बाहेरून संचालक आणण्याची योजना! डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी

याविषयी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवारी पुणे मंडळाची सोडत होती तर कोकण मंडळाच्या सोडतीतील अर्जांची प्रारूप यादी सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे सर्व्हर स्लो झाले आणि पुढे सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगण्यात आले. दुपारी १२ पासून बंद असलेले सर्व्हर अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्ववत झाले. त्यानंतर कामास सुरुवात झाली आणि विजेत्यांना दिलासा मिळाला. मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साडे चार-पाच तास ताबा देण्याचे काम ठप्प असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In mumbai mhada lottery server down winner who came to take possession waited for long hours mumbai print news css

First published on: 05-12-2023 at 20:54 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×