मुंबई : आरे वसाहतीतील जागेचा वापर प्रकल्पांसाठी करून जंगलाचा नाश केला जात आल्याचा आरोप सातत्याने केला जातो. आता त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. आरेतील ५,००० चौरस मीटर जागेचा वापर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो ६चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला जाणार आहे. ही जागा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचा दावा करीत पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला आहे.

‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून कंत्राटदार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) ‘मेट्रो ६’ कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बांधकाम साहित्याची साठवणूक करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने आपल्या ताब्यातील आरेतील व्हिलेज पहाडी, गोरेगाव न भू क्र ५८९ अ येथील पाच हजार चौरस मीटर जागा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमआरसीने पाठविलेल्या पत्रानंतर आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ट्रक आणि इतर वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देऊ केली आहे. त्याच वेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको सेन्सिटिव्ह झोन सनियंत्रण समितीची परवानगी घेण्याची जबाबदारी डीएमआरसीची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरेतील आणखी जागेचा वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
mumbai atal setu marathi news, sewri nhava sheva sea link marathi news
‘अटल सेतू’ला वाहनचालकांचा थंडा प्रतिसाद
Mumbai metro 11 marathi news, Mumbai metro latest marathi news
मुंबई: मेट्रो ११ मार्गिकेच्या संरेखनात बदल!
Vande Bharat, Tejas,
कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश
pre-trial, Metro 3, Aarey, Dadar, mumbai metro rail corporation
मेट्रो ३ : आरे – दादरदरम्यान मेट्रो गाड्या धावू लागल्या, एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
mumbai cyber fraud 25 crore
मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

हेही वाचा… लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना

झोरु बाथेना यांनी इको सेन्सिटिव्ह झोन सनियंत्रण समितीचे अध्यक्षपद असलेल्या पालिका आयुक्तांना पत्र पाठवून आरेतील जागेचा वापरास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. पर्यावरणप्रेमी अमरिता भट्टाचार्य यांनीही परवानगी देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. दरम्यान याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला. आरे वसाहतीमध्ये मेट्रो ३ची कारशेड उभारण्यास विरोध झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आरेमधील जंगलामध्ये विकासकामांची घुसखोरी होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का

जंगलाचा नाश करण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागेवरच घाव घातला जाणार आहे. याला आमचा सक्त विरोध आहे. – झोरु बाथेना, पर्यावरणप्रेमी