लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुविधा देखभालीसाठी शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ४.४५ दरम्यान पाच तास बंद राहणार आहे.
प्रवाशांना या कालावधीत इंटरनेटवरून तिकीट आरक्षण करता येणार नाही. तसेच तिकीट आरक्षण, तिकिट रद्द करणे, चौकशी सेवा, चालू आरक्षण, इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस), तिकीट परतावा, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन या सेवा उपलब्ध नसतील. तथापि, सध्याच्या रिफंड नियमांनुसार परताव्यासाठी टीडीआर जारी केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे दिली.