मुंबई : मुंबई महानगरपालिकेने चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातील भाऊ प्रधान क्रीडांगण एका सर्कससाठी दीड महिन्याकरीता भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापालिकेच्या या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. पालिकेने सर्कससाठी दिलेला परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातील मुलांना खेळण्यासाठी भाऊ प्रधान क्रीडांगण हे एकमेव मैदान आहे. या मैदानावर परिसरातील अनेक लहान-मोठी मुले विविध खेळ खेळण्यासाठी येतात. मात्र दिवाळीच्या सुट्टीत एका सर्कस चालकाने हे मैदाने महापालिकेकडून भाड्याने घेण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेनेही त्याला दीड महिन्यासाठी मैदाने भाड्याने देण्याची परवानगी दिली आहे. मात्र याबाबत माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : मुंबई: वांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

लवकरच दिवाळीची सुट्टी सुरू होत आहे. हे मैदान सर्कससाठी दिल्यास मुलांनी खेळायच कुठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय सर्कसचा तंबू उभारण्यासाठी मैदानात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होईल अशी भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिकेने सर्कससाठी दिलेली परवानगी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Story img Loader