मुंबई : कुर्ला नेहरूनगर भागातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांची व आजूबाजूच्या परिसराची दुरुस्ती मुंबई महानगरपालिकेला करावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या परिसराची पाहणी केली असता आढळून आलेल्या दुर्दशेमुळे ते संतप्त झाले होते. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा : नांदेड, छ्त्रपती संभाजीनगर न्यायालयाकडून स्वतःहून दखल; नेमके काय घडले याची माहिती सादर करण्याचे सरकारला आदेश
प्रचलित धोरणानुसार एसआरए प्रकल्पातील सार्वजनिक स्वच्छता व देखभालीची जबाबदारी प्राधिकरणाची असते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आपल्या हद्दीतील प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित विकासकामार्फत सार्वजनिक स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची निगा राखणे अपेक्षित असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यामुळे ही जबाबदारी आता महानगरपालिकेवर आली आहे.
हेही वाचा : नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप
याबाबत निर्णय घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी दुपारी एसआरए प्राधिकरणातील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी आयुक्तांनी अध्यक्ष स्थानावरून काही निर्देश दिले. शौचालयांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी संस्था नेमण्याची कार्यवाही मुंबई
हेही वाचा : अधोविश्व: दाऊद टोळीचा रुग्णालयात गोळीबार
वत्सलाताई नाईक नगर परिसर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन स्वतःहून तातडीने पावले उचलणार आहे. वत्सलाताई नाईक नगरातील संबंधित शौचालयांची दुरुस्ती आणि स्वच्छता महानगरपालिका हाती घेणार आहे. त्याचप्रमाणे शौचालय परिसरात स्टॅम्पिंग करून दुरुस्ती केली जाईल. शौचालयांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात येईल. ही कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीत असल्याने त्याची देयके प्राधिकरणाकडे पाठविण्यात येतील, असे निर्देश चहल यांनी यावेळी दिले.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai slum rehabilitation authority washrooms to be cleaned by mumbai municipal corporation after cm eknath shinde visit sra mumbai print news css