मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या खाली वांद्रे पश्चिम येथे बाॅलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या बाॅलीवूड थीम पार्कच्या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग घेतला आहे. लवकरच हे थीम पार्क पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या थीम पार्कच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जाणून घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.

एमएमआरडीए उभारत असलेली २३.६४३ किमी लांबीची ‘मेट्रो २ ब’ मार्गिका एस. व्ही. रोडवरून जात आहे. एस. व्ही. रोड परिसरातील पाली हिल, कार्टर रोडसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आदी मंडळी वास्तव्याला आहेत. या परिसरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास मेट्रो मार्गिकांच्या खांबावर, मेट्रो मार्गिकांखालील रस्त्यावर रेखाटून पर्यटकांना, नागरिकांना आकर्षित करण्याची संकल्पना स्थानिक आमदार ॲड आशिष शेलार यांनी एमएमआरडीएसमोर मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसार एमएमआरडीएने २०० कोटी रुपये खर्च करून मेट्रो मार्गिकेखाली बाॅलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील ईएसआयसी नगर – वांद्रे पश्चिमदरम्यान एकूण सात मेट्रो स्थानकांखालील ३५५ खांबांमधील मोकळ्या जागेवर हे थीम पार्क उभारण्यात येत आहे.

Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra fadanvis review meeting for msrdc ambitious Pune Ring Road and Jalna Nanded Expressway projects
पुणे वर्तुळाकार रस्ता आणि जालना-नांदेड महामार्गाच्या भूमिपूजनाला लवकरच मुहूर्त, उद्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णयाची शक्यता
Vishalgad opens for tourists after five months
तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला
Bhau Daji Lad Museum in Byculla to be inaugurated by the Chief Minister tomorrow
भायखळ्यातील भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा
planning authorities , Devendra Fadnavis,
नियोजन प्राधिकरणांचे काम कंपनीच्या धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला निर्देश
Huma Qureshi Shikhar Dhawan swimming pool photos viral
शिखर धवन घटस्फोटानंतर बॉलीवूड अभिनेत्रीला करतोय डेट? स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य

हेही वाचा : डॉ. अजित रानडेंच्या हकालपट्टीचा निर्णय रद्द, गोखले इन्स्टिट्युटची न्यायालयात माहिती

सप्टेंबरमध्ये शेलार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता कामाने वेग घेतला आहे. शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या थीम पार्कमध्ये केला जाणार आहे. १९१३ – २०२३ दरम्यानच्या चित्रपटसृष्टीच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना, सिनेमा, जुने-नवे कलाकार आणि चित्रपटातील प्रसंग अशी या थीम पार्कची रचना असणार आहे. या थीम पार्कच्या कामाने आता वेग घेतला असून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करून हे थीम पार्क नागरिकांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. हे थीम पार्क खुले झाल्यानंतर रविवारी सकाळी रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी, वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काळात या ठिकाणी चित्रपटाचे प्रशोमन करता येईल, तर चित्रपटाशी संबंधित उपक्रमही राबविले जाणार आहेत.

Story img Loader