मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेमध्ये दगडफेक झाली. माजी आमदार विद्या चव्हाण यांचे भाषण सुरू असताना दगडफेक झाली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इतरांची सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : ठाणेकर अद्वैत नादावडेकरच्या कुंचल्यातून साकारली पंतप्रधानांची भेट, तैलचित्र ठरले लक्षवेधी

vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Varsha Gaikwad
“मतदानानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…”; वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
devendra Fadnavis uddhav thackeray (1)
“उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची अब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Praful Patel on Uddhav Thackeray
प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: “…म्हणून अमोल किर्तीकर ४८ मतांनी पराभूत झाले”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा; मूळ प्रक्रियेवरच उपस्थित केला सवाल!
uddhav thackeray narendra modi (1)
“…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”

मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात आनंद नगर रिक्षा थांब्याजवळ अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास सभा सुरू होती. माजी आमदार विद्या चव्हाण यांचे भाषण सुरू असताना अज्ञात व्यक्तीने व्यासपीठाच्या दिशेने दगड फेकला. याबाबत प्रशांत कदम यांनी कुरार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. अनोळखी व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३३६ (इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीमध्ये कोणीही जखमी झाले नसून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करण्यात आली आहे. त्याद्वारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.