मुंबई : मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची’ संख्या २३९ झाली असून, आतापर्यंत या दवाखान्यांमध्ये तब्बल ५७ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रस्तावित २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने सुरू झाले असून उर्वरित ११ दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांना घराजवळच अधिकाधिक सुलभरित्या आणि मोफत उपचार देण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्याने ६ जून २०२४ पर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २३९ वर पोहोचली. यामध्ये ३३ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर, ८१ पोर्टा केबिन, १०८ उपलब्ध दवाखाने आणि १७ रेडी स्ट्रक्चरमधील दवाखाने आहेत. आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. त्यात आपला दवाखान्यात ५६ लाख ४६ हजार ९९४ रुग्णांनी उपचार घेतलेअसून १ लाख ३६ हजार ७५७ लाभार्थ्यांनी पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरचा लाभ घेतला. येत्या काही दिवसांत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘शुन्य औषध चिठ्ठी’ धोरण राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Mumbai pm awas yojana marathi news
म्हाडाच्या मुंबईतील पीएमएवायच्या घरांसाठी आता वार्षिक सहा लाखांची उत्त्पन्न मर्यादा, आगामी सोडतीत नवीन नियम लागू, इच्छुकांना दिलासा
bmc dog cat mobile app
मुंबई: भटके श्वान, मांजरींच्या तक्रारीसाठी महापालिकेचे मोबाइल ॲप
Nashik city, Nashik city to Experience Complete Water Shutdown, water shutdown in nashik, nashik news,
नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद
मुंबई : पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्त पदे भरा, कर्मचारी संघटनेचे महानगरपालिका आयुक्तांना पत्र
Mahametro has changed its train schedule Nagpur
नागपूर मेट्रोचा उपक्रम, शिबिराव्दारे समस्या निराकरण
Export of 3397 tonnes of mangoes from the facilities of Panaan
इंग्लंड, अमेरिकेत हापूस, केशर, बैगनपल्लीला पसंती!
bmc services disrupted due to agitation of asha and health workers
मुंबई : आशा व आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या सेवा बाधित
Nagpur, schedule, metro,
नागपूर : वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

हेही वाचा : पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडला; मात्र ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

आपला दवाखान्यांतून मुंबईकरांना मिळतात या सुविधा

मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार, रक्त चाचण्या, फिजिओथेरेपी सेंटर, पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला

लवकरच या सुविधाही मिळणार

खासगी निदान केंद्रांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या दरात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय या सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : मुंबई: महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांची इमारत धोकादायक घोषित! गच्चीवर बुलडोझर नेऊन इमारतीचे पाडकाम

या वेळेत उपचार

पोर्टा केबिन आणि रेडी स्ट्रक्चर १३ दवाखाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत, तर ९८ दवाखाने दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान सुरू असतात. त्याचप्रमाणे नियमित १०८ दवाखाने दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी खुले असतात.