मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल ११ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील १,३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरूस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील ९०० मिलीमीटर व्यासाचे फुलपाखरू झडप (बटरफ्लाय वॉल्व्ह) बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

हे काम गुरुवार, १९ जून रोजी दुपारी २ पासून शुक्रवारी २० जून रोजी मध्यरात्री १ पर्यंत एकूण ११ तास चालणार आहे. या कामादरम्यान संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा ११ तास बंद करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात अंधेरी पश्चिमचा भाग असलेल्या के पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दुरूस्ती कालावधीत म्हणजे गुरुवार, १९ जून रोजी दुपारी २ पासून शुक्रवारी २० जून रोजी मध्यरात्री १ पर्यंत दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत के पश्चिम विभागातील खालील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

पार्ले पश्चिम : लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग (सबवे) , जुहू विलेपार्ले विकास योजना (जे. व्ही. पी. डी. स्कीम), जुहू गावठाण क्रमांक ०३, व्ही. एम. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)

मोरागाव (जे. व्ही. पी. डी.) : मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक ०१ आणि ०२, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिलबर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) : जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री १०.०० ते मध्यरात्री १२.३०)