मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या सुरू असलेल्या पक्षी गणणेदरम्यान पांढऱ्या रंगाचे पोट असलेल्या सागरी गरुडाचे (व्हाईट – बिलिड सी – ईगल) दर्शन घडले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्षी गणना करण्यात येत आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्षीगणना सुरू असून ते काम दीर्घकालीन स्वरूपाचे आहे. या पक्षी गणणेत प्रत्येक ऋतूमध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात येत आहे. याच सर्वेक्षणादरम्यान राष्ट्रीय उद्यानात पांढऱ्या रंगाचे पोट असलेल्या सागरी गरुडाची नोंद करण्यात आली. समुद्री गरूड हा पक्षी सामान्यतः बेट, किनारी प्रदेश आणि पाणथळ प्रदेशात आढळतो. हा पक्षी जंगल किंवा खडकाळ प्रदेशात घरटे बांधून राहतो. समुद्री गरूड हा घारीपेक्षा आकाराने मोठा असून त्याचा रंग वरून करडा असतो, तर डोके, मान व खालचा भाग पंढरा शुभ्र असतो. उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीचा आकार यामुळे या पक्ष्याची ओळख पटते. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. समुद्रकिनाऱ्यावर ते एकटे किवा जोडीने आढळतात.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Leopard in Rashtrapati Bhavan
Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…
Tiger, gypsy, Tadoba, gypsy drivers,
ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”

हेही वाचा : डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

श्रीलंका, लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार बेट तसेच गुजरातमध्ये हे पक्षी आढळतात. दक्षिण भारतात नोव्हेंबर – मार्च, तर उत्तरेकडे जानेवारी – एप्रिल या काळात सागरी गरुड आढळतात. पांढऱ्या पोटाचे सागरी गरूड साधारणपणे झाडावर उंचावर बसलेले किंवा जलमार्ग आणि लगतच्या जमिनीपासून उंचावर विहार करताना आढळतात. प्रामुख्याने मासे, कासव आणि समुद्री साप यांसारखे जलचर ते खातात. हा एक कुशल शिकारी पक्षी आहे. या पक्ष्यांचा प्रजनन हंगाम मे – ऑक्टोबर दरम्यान असतो. प्रजनन हंगामाच्या सुरुवातीला ताजी हिरवी पाने आणि डहाळ्यांनी ते घरटे विणतात. यांचे घरटे जमिनीपासून झाडावर ३० मीटर उंचीवर असते.

हेही वाचा : लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ४२ हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने पक्षांची नोंद करीत आहे. आतापर्यंत एकूण ८४ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. आसिफ खान, संचालक किशोर रिठे, सुमित दोथरे, शार्दुल बाजीकर, प्रियदर्शनी सुपेकर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन आणि सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या सहाय्याने ही पक्षी गणना करण्यात येत आहे.