मुंबई : प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिसाच्या जेवणात अळी सापडल्याचा गंभीर प्रकार बुधवारी उघडकीस आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट अपलोड करून त्याबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणानंतर जेवण पुरवणाऱ्या कॅटरर्सविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस दलात रूजू झालेल्या पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यावेळी कलिना येथील प्रशिक्षण केंद्रातील एका प्रशिक्षणांर्थीच्या जेवणात अळी सापडल्याचे ट्वीट संजय पांडे यांनी केले आहे. पोलिसाच्या जेवणात अळी सापडल्याबाबत पांडे नाराजी व्यक्त केली. पोलिसांना अशी वागणूक दिली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

Pooja Khedkar Audi
Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त, कागदपत्र सादर करण्याचे निर्देश; ‘एवढ्या’ रुपयांचा दंडही ठोठावला!
pooja khedkar ias marathi, pooja khedkar ias,
पूजा खेडकर यांची अनेक विभागांतील प्रशिक्षणाला दांडी, प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणी गैरवर्तन केल्याचे विभागप्रमुखांचे अहवाल
‘आरटीई’तील दुरुस्तीबाबत निर्णय पुढील आठवड्यात; सरकारच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह | Decision on amendment in RTE next week Court questions government claim Mumbai
‘आरटीई’तील दुरुस्तीबाबत निर्णय पुढील आठवड्यात; सरकारच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Pune IAS officer Pooja Khedkar Photograph:
‘आयएएस’ अधिकारी की नववतनदारी?
mumbai high court
विशेष मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्याचे काय झाले? उच्च न्यायालयाची केंद्र-राज्य सरकारला विचारणा
Barty awarded contracts to institutes with no experience in JEE and NEET exam coaching Nagpur
‘जेईई’,‘नीट’चा अनुभव नसणाऱ्या संस्थांना विनानिविदा कंत्राट; ‘बार्टी’च्या संस्था निवडीच्या…
kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
fly, HIV, Trainee Pilot,
केवळ एचआयव्हीग्रस्त असल्याने उड्डाण करण्यास नकार, डीजीसीएच्या निर्णयाविरोधात प्रशिक्षणार्थी वैमानिक उच्च न्यायालयात

हेही वाचा : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाबाबत ‘पोस्ट’, मुख्याध्यापिकेवर राजीनाम्यासाठी सक्ती

दोन दिवसांपूर्वी असा प्रकार घडला होता. याप्रकरणी तात्काळ संबंधित कॅटरर्सवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे सह पोलीस आयुक्त (प्रशासन) जयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.