मुंबई : राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून कोकणपट्ट्यात अतिवृष्टी होत आहे. तर, मुंबई, ठाणे भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणातील काही भागांवर दाट ढग जमा झाले असून या परिसरात पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत दाट ढग जमा झाल्यामुळे कोकण-गोवा आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आदी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद

ठाणे जिल्हा – उल्हासनगर १७३ मिमी, शहापूर ६८ मिमी, मुरबाड ३५ मिमी, अंबरनाथ १८८ मिमी, कल्याण १९४ मिमी

पालघर जिल्हा – तलासरी १३३ मिमी, वाडा ८९.२५ मिमी, विक्रमगड ८१ मिमी, पालघर १८३.५ मिमी, वसई १३६ मिमी, जव्हार ३६ मिमी, मोखाडा १९ मिमी, डहाणू १३१.२२ मिमी

रायगड जिल्हा – पेण १३९ मिमी, म्हसळा १२७ मिमी, माणगाव २३० मिमी, उरण १४६ मिमी, श्रीवर्धन ८१ मिमी, खालापूर १३५ मिमी, रोहा १०७ मिमी, पोलादपूर १६९ मिमी, मुरुड ११६ मिमी, सुधागड १३४ मिमी, तळा २४५ मिमी, पनवेल १७२.२ मिमी, माथेरान १२२ मिमी, अलिबाग ८८ मिमी, महाड १८८ मिमी, कर्जत १०१.६ मिमी

सिंधुदुर्ग जिल्हा – दुधमार्ग १४० मिमी, मालवण २२५ मिमी, मुळदे ११८.४ मिमी, सावंतवाडी १८७ मिमी, देवगड ४५ मिमी, वैभववाडी २३० मिमी, रामेश्वर ५५.६ मिमी

रत्नागिरी जिल्हा – खेड ७४ मिमी, लांजा ३४२ मिमी, चिपळूण १६९ मिमी, देवरुख २१० मिमी, मंडणगड २०५ मिमी, दापोली १४५ मिमी, गुहागर ७७ मिमी, वाकवली १२१ मिमी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In next 2 3 hours heavy rain prediction in mumbai mumbai print news asj
First published on: 05-07-2022 at 11:19 IST