मुंबई : मुंबईत मे महिन्यात ९,६६१ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एप्रिलमध्ये साडेदहा हजारांहून अधिक घरांची विक्री झाली होती. मेमध्ये घर विक्रीत काहीशी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचे संकट संपल्यानंतर बांधकाम व्यवसायात तेजी येईल असे वाटत होते. मात्र २०२२ मध्ये घर विक्री स्थिर राहिली, घर विक्रीत मोठी वाढ झाली नाही. अशीच परिस्थिती २०२३ मध्ये दिसत आहे. मागील पाच महिन्यांत ९ ते १३ हजारादरम्यान घरांची विक्री झाली आहे. जानेवारीत ९ हजार घरे विकली गेली असून यातून ६९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तर फेब्रुवारीत ९,६८४ घरांची विक्री झाली असून यातून १,१११ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मार्चमध्ये मात्र घर विक्रीने १३ हजाराचा टप्पा पार केला. मार्चमध्ये १३,१५१ घरांची विक्री झाली असून १,२२५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मार्चमध्ये घरांच्या विक्रीत काहीशी वाढ झाली होती. मात्र एप्रिलमध्ये घरांच्या विक्रीत पुन्हा काहीशी घट झाली होती. एप्रिलमध्ये १०,५१४ घरांची विक्री झाली असून या घर विक्रीतून ८९९ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

हेही वाचा… मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निर्मिती संस्थासाठी ‘स्वच्छतेची मार्गदर्शक नियमावली’ जाहीर

हेही वाचा… एमएमआरडीएचा पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित

मार्च आणि एप्रिलमध्ये दहा हजारांहून अधिक घरांची विक्री झाली होती. मात्र मेमध्ये १० हजार घरांचीही विक्री होऊ शकलेली नाही. मे महिन्यात ९,६६१ घरांची विक्री झाली असून यातून ८२० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मुळात मे महिन्यात कायम घर विक्रीत मंदी असते. तर दसरा-दिवाळीत घरांच्या विक्रीत वाढ होते. त्यामुळे आता सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये घर विक्री वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the month of may in mumbai more than nine and a half thousand houses sold mumbai print news asj
First published on: 31-05-2023 at 17:10 IST