मुंबई : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये १४ निष्पाप व्यक्तींना प्राण गमवावे लागले तर जखमींचा आकडा ८८ वर गेला. या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या जखमींना शोधण्यासाठी नातेवाईकांना राजावाडी, केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालये पालथी घालावी लागली तर रात्री शवविच्छेदन करत नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांना दुपारपर्यंत थांबावे लागले. त्यातील काहीजण रात्रभर अन्न, पाण्यावाचून रुग्णालयांमध्ये बसून होते. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुंबईत कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यापासून, मृतांचे शवविच्छेदन तसेच नातेवाईकांना आवश्यक ती मदत याचा सर्वांगिण विचार करून महापालिकेची स्वतंत्र वैद्यकीय आपत्कालीन यंत्रणा निर्माण करण्याची संकल्पना अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी मांडली आहे.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनेनंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात मोठ्या रुग्णांना नेण्यात येत होते. या रुग्णांना तात्काळ तळमजल्यावर उपचार मिळावे यासाठी रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर त्याबाबत व्यवस्था केली. सर्व कर्मचारी एकदिलाने कामाला लागून तळमजल्यावरील एक जागा मोकळी केल्यामुळे वेगाने उपचार करणे शक्य झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सामानक्त: मोठ्या दुर्घटनांच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी तसेच नेतेमंडळींच्या भेटींमुळे रुग्णालय व्यवस्थापनावर मोठा ताण येतो. सुनियंत्रित उपचारात अनेकदा अडचणी येत असतात. मुंबईत यापूर्वी रल्वे दुर्घटना, एल्फिन्स्टन येथील चेंगराचंगरी, बॉम्बस्फोट तसेच अन्य मोठ्या दुर्घटना झाल्या होत्या. अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाला वेगाने काम करण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. अशा घटना भविष्यात घडल्यास वैद्यकीय सेवा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय आपत्कालीन यंत्रणा निर्माण करण्याचा मनोदय मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केला.

dcm ajit pawar not reachable since after baramati constituency polling
अजित पवार कुठे आहेत?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
congress thackeray group attack on modi roadshow
होर्डिंग दुर्घटना ताजी असताना मोदींचा रोड शो; काँग्रेस, ठाकरे गटाची टीका
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Ghatkopar incident
VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!
Raj and uddhav
राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय? नारायण राणेंनी भरसभेत सांगितला दोघांचाही स्वभाव; म्हणाले, “मी बऱ्याच वर्षांपासून…”
Eknath Shinde and uddhav thackeray
मध्यरात्री मोठी घडामोड, उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत, नाशिकमध्ये ट्विस्ट!

हेही वाचा – घाटकोपर दुर्घटना : कारणमीमांसा करण्यासाठी व्हीजेटीआयची मदत घेणार

याबाबत डॉ शिंदे म्हणाले, यापूर्वी मुंबईत घडलेल्या वेगवेळ्या मोठ्या दुर्घटनांचा आढावा घेण्यात येईल तसेच पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आणि अशा दुर्घटनांच्या वेळी सामना केलेले माजी अधिष्ठाता तसेच आपत्कालीन यंत्रणांचे तज्ज्ञ यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा निर्माण केली जाईल. यासाठी संबंधितांना वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करून प्रशिक्षित करण्यात येईल असेही डॉ शिंदे यांनी सांगितले. यात अपघात विभागात तात्काळ उपचार सुरु करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा निर्माण करणे, तात्काळ आवश्यक वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध करणे, अशा घटनांचे रुग्णालय प्रमुखांकडून योग्य प्रकारे नियंत्रण करणे, आपघातग्रस्तांच्या नातेवाईकांची व्यवस्था व त्यांना योग्य माहिती तात्काळ उपलब्ध करून देणारी यंत्रणा निर्माण करणे, तसेच नेतेमंडळींच्या भेटीचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे जेणेकरून उपचाराच्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही. बहुतेकवेळा नेत्यांबरोबर मोठ्या संख्येने गर्दी होऊन उपचारात अडथळे होतात असे डॉक्टरांचे म्हणणे असल्यामुळे नेत्यांच्या भेटीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मृतदेह वेळेत नातेवाईकांच्या हवाली करणे, मृतदेहांची ओळख पटविणे अशा अनेक मुद्द्यांचा यात विचार केला जाणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – मालवणी येथील २०१५ सालचे दारूकांड : दोषसिद्ध चार आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

शीव व केईएम अधिष्ठाता असताना अशा काही घटनांचा सामना मला करावा लागला आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये बऱ्यापेकी यंत्रणा कार्यरत आहे. उपनगरीय रुग्णालयांमध्येही दहाबारा रुग्ण एकाच वेळी दाखल झाल्यास उपचार करण्याची तयार आहे. मात्र एकाच वेळी पन्नास-शंभर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आल्यास वौद्यकीय आपत्कालीन यंत्रणा तयार करणे आवश्यक असल्याचे केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. पालिकेच्या कुपर, केईएम व नायर आदी तीन चार प्रमुख रुग्णालयात अशा प्रकारची प्रशिक्षित पथके तयार करता येतील. यासाठी पालिकेच्या परळ येथील आपत्कालीन प्रशिक्षण केंद्रात संबंधितांना विशेष प्रशिक्षत करता येईल. खरतर पालिकेच्या अग्निशमन दल, डॉक्टर, सुरक्षा रक्षकांसह संबंधित यंत्रणेतील आवश्यक घटकांना प्राथमिक आपत्कालीन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ माहिती देणे, रुग्णालयात येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आदी अनेक मुद्यांचा विचार यात करता येईल. तसेच या आपत्कालीन वैद्यकीय पथकासाठी गतिमान वाहन व्यवस्था दिली पाहिजे असेही डॉ सुपे यांनी सांगितले.