मुंबई : विविध महाविद्यालयांनी अलीकडच्या काळात नवनवीन स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम सुरू केले असून विद्यार्थ्यांचा कल हा पारंपारिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांकडे वाढत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम पदवी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीवर झाल्याचे दिसून आले. यंदा स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ आणि पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झालेली आहे.

यंदा प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक १ लाख ८८ हजार ३९० अर्ज सादर झाले, तर याव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठीही सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले.

admission date for agriculture course
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; प्रवेशाची पहिली यादी ४ ऑगस्ट रोजी
bed, CET, Admission, competition,
बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस, सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Revised schedule, admissions ,
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
BA BSc Bed Law 5 year courses admissions open Mumbai
बीए/बीएस्सी बीएड, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात
agriculture course mht cet marathi news
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू, प्रवेशासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध
 Will students of BBA BCA courses get scholarship Pune print news
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार?
Direct admission to the second year of Agriculture degree course Mumbai news
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार; २६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
3 to 4 percent drop in admission qualifying marks Mumbai
प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट

हेही वाचा >>>निवडणूक कामावरून न परतणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा; रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी गुरूवार, १३ जून रोजी जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळावरून जाहीर केली. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) १४ जून ते २० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.

यंदा माटुंग्यातील पोद्दार महाविद्यालयात पहिल्या गुणवत्ता यादीनुसार गतवर्षीच्या तुलनेत ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये साधारण दीड टक्क्यांनी घट झालेली आहे. यंदा ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमासाठी ९४.०० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असतील. गतवर्षी ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमासाठी पोद्दार महाविद्यालयात ९५.५० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण होते. या शिवाय यंदा बी.कॉम – फायनान्शिअल मार्केट्ससाठी ९३.८३ टक्के (गतवर्षी ९३.०८ टक्के), बी.एस्स्सी. – डाटा सायन्स अँड अनॅलिटीक्ससाठी ८६.०५ टक्के (गतवर्षी ८५.८३ टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तसेच, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात पहिल्या गुणवत्ता यादीनुसार बी.ए. अभ्यासक्रमासाठी ९२.३३ टक्के, बी.ए. मानसशास्त्र ९१.८३ टक्के, बी. कॉम. (अकाऊंट ॲण्ड फायनान्स) ९१.६७ टक्के आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी ६५ टक्के इतके प्रवेश पात्रता गुण आहेत.

हेही वाचा >>>ऑनलाइन फसवणुकीसाठी बँक खातेधारक जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार रुईया महाविद्यालयांत बी.ए. – इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ६ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसते आहे. यंदा ‘बी.ए.’ इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमासाठी ९२.०० टक्के (गतवर्षी ९८.०८ टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण असतील. यंदा बी.ए मराठी माध्यमाला प्रवेश घेण्यासाठी ४५.०० टक्के, बी.ए. कम्युनिकेशन अँड मीडिया इंग्रजी माध्यम ९३.०२ टक्के व मराठी माध्यम ४१.६७ टक्के, बी.एस्सी. ६९.३३ टक्के, बी.एस्स्सी – बायोटेक्नॉलॉजीसाठी ९२.०२ टक्के, बी.एस्स्सी – बायोकेमिस्ट्रीसाठी ७४.३३ टक्के आणि बी.एस्स्सी – कम्प्युटर सायन्ससाठी ८२.१७ टक्के, बी.एस्स्सी बायोअनॅलिटीकल सायन्ससाठी ५०.६७ टक्के इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तसेच, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत ‘बी.ए.’ अभ्यासक्रमासाठी ८१.१६ टक्के, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ८३.३३ टक्के, बी.एस्स्सी. अभ्यासक्रमासाठी ६८.०० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असतील. डहाणूकर महाविद्यालयात बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ७५ टक्के आणि बी.कॉम. – मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखेतून ८३.०० टक्के, विज्ञान शाखेतून ६४.३३ टक्के आणि कला शाखेतून ४९.०० टक्के प्रवेश पात्रता गुण आहेत. माटुंग्यातील रुपारेल महाविद्यालयांत ‘बी.ए.’ अभ्यासक्रमासाठी ८८.३३ टक्के, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ८२.०५ टक्के, बी.एस्स्सी – कम्प्युटर सायन्ससाठी ७८.८३ टक्के, बी.एस्स्सी – आयटी अभ्यासक्रमासाठी बारावीत गणित विषयात १०० पैकी ७० इतके प्रवेश पात्रता गुण आहेत.

यंदा मुंबई विभागांत सर्वाधिक ९६.३५ टक्के हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. गतवर्षी हेच प्रमाण ९१.१८ टक्के इतके होते. उत्तीर्णांचे वाढलेले प्रमाण आणि त्याचवेळी अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यांमुळे मुंबई विभागांत विज्ञान शाखेच्या प्रवेशाचे पात्रता गुण वाढण्याची शक्यता होती. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ‘बी.एस्स्सी.’ अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट झाली आहे. ‘बी.एस्स्सी.’ अभ्यासक्रमाचे प्रवेश पात्रता गुण हे ७० टक्क्यांच्या खाली आले आहेत.