मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १०-११ या फलाटांचे नुकतेच विस्तारीकरण करण्यात आले. या दोन्ही फलाटांची लांबी ३८५ मीटरने वाढवून ६९० मीटर करण्यात आली. त्यामुळे आता १६ डब्यांच्या एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करणे शक्य झाले आहे. मध्य रेल्वेने मुंबई – कोल्हापूर आणि मुंबई – होसपेटे या दोन्ही एक्स्प्रेसला प्रत्येकी तीन डबे जोडून १९ डब्यांची एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासी क्षमतेत वाढ होऊन गर्दी विभाजित होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० ते १४ च्या विस्तारीकरणाच्या ६२.१२ कोटी रुपयांचे खर्चाच्या प्रकल्पाला २०१५-१६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर या फलाटांची लांबी ३०५ मीटर ते ३८५ मीटरने वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र अनेक समस्यांमुळे या प्रकल्पाचे काम कूर्मगतीने सुरू होते. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० ते ११ च्या विस्तारीकरणाचे काम २ जून २०२४ रोजी पूर्ण झाले. या कामामुळे येथून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १६ डबे असलेल्या १३ रेल्वेगाड्यांच्या डब्यांत वाढ करणे शक्य झाले आहे. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई कोल्हापूर आणि मुंबई – होसपेटे या एक्स्प्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यात मदत होणार आहे. येत्या काळात आणखी काही रेल्वेगाड्यांच्या डब्यात वाढ केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

Vishalgad, journalists, violent act, Kolhapur,
कोल्हापूर : विशाळगडच्या हिंसक कारनाम्यात पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावर
Goregaon-Mulund Link Road, pm modi,
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
thane, Kolshet Bay Filling Case, Encroachment on Mangroves in Balkum, Encroachment on Mangroves in Kolshet, Forest Minister Sudhir mungantiwar, officials are in a round of inquiry, thane news
कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
Sensex at a new level of 80049 points print
सेन्सेक्स’ ८०,०४९ अंशांच्या नव्या शिखरावर; निफ्टीची २४,४००ला गवसणी
farmers Member of sugar factory raise Slogan against MLA Prakash Abitkar
‘बिद्री’च्या सभासदांचा भर पावसात मोर्चा;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
Slum Rehabilitation in Mumbai and Mumbai Metropolitan Region
प्राधिकरणांना ‘झोपु’चे लक्ष्य!दोन लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश
The road from Shivaji Chowk to Papachi Tikti in Chappal Line is controversial
कोल्हापूर महापालिकेचा आणखी एक फोलपणा; रस्ता वर्षभरातच नादुरुस्त, ‘ आप’च्या प्रयत्नाने काम सुरू

हेही वाचा >>>लोकलवर ‘डिजिटल डिस्प्ले’; उपनगरी रेल्वे धीमी की जलद, स्थानकाची माहिती उपलब्ध

गाडी क्रमांक ११०२९/११०३० सीएसएमटी – कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त शयनयान डबे आणि एक अतिरिक्त सामान्य द्वितीय श्रेणी डबा जोडण्यात येणार आहे. कोल्हापूर येथून २५ जून रोजीपासून आणि सीएसएमटी येथून २८ जून रोजीपासून अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच गाडी क्रमांक १११३९/१११४० सीएसएमटी ते होसपेटे एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त शयनयान डबे आणि एक अतिरिक्त सामान्य द्वितीय श्रेणी डबा जोडण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून २६ जून रोजीपासून आणि होसपेटे येथून २७ जून रोजीपासून जादा डबे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक ११०२९/११०३० आणि १११३९/१११४० या रेल्वेगाड्यांची सुधारित संरचना ही एक प्रथम वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित डबे, दोन वातानुकूलित चेअर कार, ६ शयनयान, ४ सेकंड सिटिंग, ४ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण १९ डबे असणार आहेत. रेल्वेगाडीच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी तिकिटांची स्थिती तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

फलाट क्रमांक १२-१३ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू

सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, फलाट क्रमांक १२-१३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे फलाटही २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहण्यासाठी सक्षम होतील. सध्या या दोन्ही फलाटांवरून एक्स्प्रेस सेवा बंद आहे. ही कामे सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र पावसाचा अडथळा आल्यास या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.