मुंबईत १०० हून अधिक प्रभाग अराखीव

मुंबई : मुंबईतील प्रभागांची संख्या नऊने वाढविण्यात येणार असून त्याबाबतचा प्रभाग पुनर्रचना आराखडा मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे प्रारूप आराखडय़ात इतर मागासवर्गाचे आरक्षण वगळण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत २००७ नंतर पहिल्यांदाच शंभरहून अधिक प्रभाग खुले झाले आहेत. इतर मागासवर्गाचे आरक्षण वगळून निवडणुका झाल्यास आगामी निवडणुकीत तब्बल ११० प्रभाग खुले होणार आहेत.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
Navi Mumbai Traffic congestion
नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

इतर मागासवर्गाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र,  महापालिका निवडणुकांना विलंब होऊ नये म्हणून आयोगाने निवडणूक पूर्व कामे सुरु केली आहेत. निवडणूक पृूर्व प्रक्रियेला विलंब होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने इतर मागासवर्ग वगळता आरक्षणाचा टक्का ठरवला आहे. तसेच प्रभाग पुनर्रचना आराखडा प्रसिद्ध करण्याच्या सूचना पालिकेला केल्या आहेत. त्यावर येत्या १५ दिवसांत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे तूर्तास या सर्व जागा खुल्या गटात दाखवण्यात आल्या आहेत. सध्या तरी ओबीसींच्या संख्येशिवायच ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. लोकसंख्यावाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने दिवाळीपूर्वी घेतला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची म्हणजेच नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे. त्याकरिता २०११ च्या जनगणनेनुसार नऊ प्रभाग वाढवण्यात आले आहेत. एक कोटी २४ लाख ४२ हजार २७३ लोकसंख्येवर आधारित ही प्रभाग रचना तयार केली आहे. यामध्ये सरासरी ५२ हजार ७२२ लोकसंख्येचा आधार घेत प्रभाग रचना ठरवण्यात आली आहे. कमीतकमी ४७ हजार ४५० आणि जास्तीत जास्त ५७ हजार ९९४ याप्रमाणे लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे.

अनुसुचित जाती व जमाती तसेच महिला आरक्षण वगळून २००७ च्या निवडणुकीत १०७  प्रभाग खुले होते. तर, त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीत ७७ आणि २०१७ च्या निवडणुकीत ७५ प्रभाग खुले होते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये २२७ प्रभागांपैकी ६१ प्रभाग इतर मागासवर्गासाठी राखीव होते. यावेळी आयोगाने एसी, एसटी तसेच महिला प्रवर्गाचे आरक्षण राखून इतर जागा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे खुल्या जागांची संख्या वाढली आहे. यावेळी तब्बल ११० जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहणार आहेत. एकूण २३६ जागांपैकी एकूण १५ जागा अनुसुचित जातींसाठी तर दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. ११८ जागा महिलांसाठी आहेत. त्यापैकी ८ जागा अनुसुचित जातीतील महिलांसाठी तर एक जागा अनुसुचित जमातीतील महिलेसाठी राखीव असेल. तर ११० जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत.