एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच

एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यासोबतही झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.

मुंबई: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के  महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु के ले आहे. परंतु या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने गुरुवारीही उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने घेतला आहे. दरम्यान, उपोषणात कामगार सामील झाल्याने राज्यातील ११ आगार पूर्णत: बंद राहिले. तर चार आगार अंशत: बंद राहिल्याने एसटी सेवांवर परिणाम झाला.

विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार संघटनांनी उपोषण सुरु के ले असून त्यात एसटीतील १७ संघटना सामील आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणाला सुरुवात के ली. यासह राज्यातील विभागीय कार्यालयांसमोरही कामगारांनी उपोषण के ले. यात एकू ण ११ आगारातील एसटीची सेवा पूर्णत:बंद झाली. तर अन्य विभागातील चार आगार अंशत: बंद राहिले. परिणामी प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले. शहरीबरोबरच ग्रामीण भागातही एसटी सेवा बंद राहिली. दरम्यान, एसटी कामगार संघटनांच्या कृती समिती सदस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार के ला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तर सायंकाळी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यासोबतही झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indefinite hunger strike of st workers continues zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!