लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: क्षयरुग्णांवर चांगले उपचार करता यावेत यासाठी केईएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र क्षयरोग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील क्षयरोग बाह्यरुग्ण विभागामध्ये ये-जा करताना अन्य रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवे केंद्र तळमजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. लवकरच हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
mumbai, J J Hospital, ART Center, HIV AIDS Treatment, Celebrate 20 Years, 43 thousand, Patients Treated,
जे. जे. रुग्णालयात ४३ हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार, पहिल्या एआरटी केंद्राला २० वर्षे पूर्ण
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

केईएम रुग्णालयाच्या सीव्हीटीसी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर क्षयरोग रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये अनेक अन्य विभाग असल्याने या इमारतीमध्ये नेहमीच गर्दी असते. पाचव्या मजल्यावर जाणाऱ्या क्षयरुग्णांमुळे अन्य रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या इमारतीच्या तळमजल्यावर क्षयरोग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा… दाभोलकर हत्या प्रकरणावर न्यायालयाच्या देखरेखीची आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाकडून दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य

हे केंद्र सुरू झाल्यावर रुग्णांना तळमजल्यावरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे क्षयरुग्णांना अन्य रुग्णांसोबत उद्वाहनातून जावे लागणार नाही. क्षयरोग केंद्रामध्ये रुग्णांना सर्व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच या केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यामुळे या इमारतीमध्ये येणाऱ्या अन्य रुग्णांना त्यांचा त्रास होणार नाही. क्षयरोग केंद्राचे काम सुरू असून, लवकरच हे केंद्र रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.