राज्य सरकारचा बजाज बजाज फिनसर्व्हशी करार

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि ‘बजाज फिनसर्व्ह’ यांच्यात सुमारे पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार शनिवारी करण्यात आला. आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘बजाज बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या वेळी उद्योग सचिव हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे आदी उपस्थित होते. पुण्याजवळील मुंढवा येथे हे वित्तीय केंद्र उभारण्यात येणार आहे.

या गुंतवणुकीमुळे ४० हजार रोजगारनिर्मिती होऊन ‘आर्थिक सेवा हब’ होण्यासाठी पुण्याला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. पुण्याजवळ मुंढवा येथे या वर्षांअखेर प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. सेवा क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केली आहे. राज्याच्या सकल राज्य उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा ५३ ते ५८ टक्क्यांपर्यंत आहे. सेवा क्षेत्रातील या मोठय़ा गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राचा मोठा फायदा होणार आहे. प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीत भर पडणार आहे. आर्थिक सेवा हबमुळे वित्तीय तसेच सेवा क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे.

maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Increase in ST accidents 3 thousand 121 accidents in two months
‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?