scorecardresearch

भारत फॅशन जगताची राजधानी व्हावी!; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची अपेक्षा

देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक पारंपरिक कला आहेत. या कला जोपासणारे कलाकार, विणकर याना फॅशनचे अधिकृत शिक्षण मिळालेले नाही.

मुंबई : फॅशनचे अधिकृत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील कलाकार, विणकर यांची कला जगभरात पोहोचविण्यासाठी पावले उचलायला हवीत, तरच भारत हा फॅशन जगतामध्ये राजधानी होऊ शकेल असे मत केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योग आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या(निफ्ट) पदवीदान समारंभात व्यक्त केले. सोफिया भाभा सभागृहात हा समारंभ शनिवारी पार पडला. संस्थेचे महासंचालक शंतनू, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता प्रा. वंदना नारंग, संस्थेच्या आवराचे संचालक प्रा. पवन गोदीवाला, प्रा. रूप अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक पारंपरिक कला आहेत. या कला जोपासणारे कलाकार, विणकर याना फॅशनचे अधिकृत शिक्षण मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी या कलाकारांपर्यत पोहोचून उत्पादनाचे आकर्षक वेष्टन, ब्रँिडग आणि विपणन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून त्यांना योग्य मोबदला मिळेल. देशातील फॅशन जगताचा विकास करून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन गोयल यांनी विद्यार्थ्यांना केले. फॅशनचे शिक्षण देणाऱ्या शासकीय आणि खासगी अशा सर्व संस्थांसाठी योग्य दर्जाच्या आणि एकसमान असा अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना गोयल यांनी संस्थेच्या अधिष्ठात्यांना या वेळी केली.

कोल्हापुरीच्या निर्यातीसाठी प्रयत्न 

कोल्हापुरी चप्पलची रचना इतकी सुंदर आणि आरामदायी आहे. तरीही ती परदेशापर्यंत पोहोचलेली नाही. खरेतर आपण याची निर्यात करायला हवी, असे मत गोयल यांनी व्यक्त केले. यावेळी २०२० आणि २०२१ या वर्षांत पदवीधर झालेल्या ६०० विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India official teaching fashion capital fashion world expectations union minister piyush goyal ysh

ताज्या बातम्या