भारतामधील सर्वात जुनं वृत्तपत्र झालं २०० वर्षांचं; मुंबईशी आहे खास कनेक्शन

‘मुंबई समाचार’ ने आज (१ जुलै २०२१) यशस्वीरित्या २०० वर्षाचा टप्पा गाठला आहे

India oldest newspaper Mumbai Samachar reaches 200 years
१८२२  मध्ये ‘बॉम्बे समाचार’ या नावाने साप्ताहिक पेपर म्हणून याची सुरुवात झाली होती ( Express Photo BY Ganesh Shirsekar)

दक्षिण मुंबईतील ‘फोर्ट’ संकुलाच्या मध्यभागी असलेल्या ‘रेड हाऊस’ नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र ‘मुंबई समाचार’ ने आज (१ जुलै २०२१) यशस्वीरित्या २०० वर्षाचा टप्पा गाठला आहे.

मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की, वृत्तपत्राने २० वर्षांपूर्वी एक संशोधन केले होते आणि हे लक्षात आले आहे की हे भारतातील सर्वात प्राचीन प्रकाशन आणि जगातील चौथे सर्वात जुने प्रकाशन आहे. जे अद्याप कार्यरत आहे. १८२२ मध्ये ‘बॉम्बे समाचार’ या नावाने साप्ताहिक पेपर म्हणून याची सुरुवात झाली. त्यावेळेस मुख्यतः वाचकांना समुद्रातील उद्योग आणि वस्तूंच्या हालचालींबद्दल माहिती देण्यासाठी साप्ताहिक सुरु केले गेले होते. त्यानंतर याचे एका वृत्तपत्रात रूपांतर झाले.

पारसी विद्वान फर्दुनजी मर्जबान यांनी बंगाली वर्तमानपत्र ‘समाचार दर्पण’ सुरू केल्याच्या चार वर्षांनंतर या साप्ताहिकाचे प्रकाशन करण्यास सुरुवात केली, जे भारतात प्रकाशित होणारे दुसरे गैर इंग्रजी वृत्तपत्र बनले. पहिल्या १० वर्षांसाठी हे आठवड्याचे वृत्तपत्र होते. त्यानंतर ते द्वि-साप्ताहिक आणि १८५५ पासून दैनिक वृत्तपत्र बनले.

हेही वाचा- समजून घ्या : आपल्या देशाला ‘भारत’, ‘हिंदुस्तान’ आणि ‘India’ ही नावं कशी पडली?

“एक वृत्तपत्र म्हणून आपण २०० वर्षे टीकलो. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी कोणीही अगदी मुद्रीत माध्यमं इथून पुढे टीकू शकणार नाही. पण अशी आशा आहे की मुंबई समचार ३०० वर्षे पूर्ण करेल.” असे मुंबई समचारचे ४० वर्षापासून संचालक असलेले हार्मूसजी कामा म्हणाले.”

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India oldest newspaper mumbai samachar reaches 200 years srk