scorecardresearch

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत समुद्रात उतरवण्यात आले

भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्यात आले.

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत समुद्रात उतरवण्यात आले
नौदलाचे हेलिकॉप्टर (संग्रहित छायाचित्र) (ie File Photo)

मुंबई :  भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर बुधारी आणीबाणीच्या स्थितीत मुंबईनजिक समुद्रात उतरवण्यात आले.  हेलिकॉप्टरमधील   तीन्ही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: नवी निवृत्ती योजना, १५ वर्षांनंतरही धोरण निश्चितीत अपयश

भारतीय नौदलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर बुधवारी नियमित उड्डाण करत असताना मुंबईजवळ समुद्रात आणिबाणीच्या स्थिती उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून नौदलातील तीन कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा >>> मेट्रोची धाव आता उल्हासनगरपर्यंत; ‘मेट्रो ५’चा विस्तार करण्यासाठी लवकरच सल्लागारांची निवड

भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच  तात्काळ शोधकार्य व बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती पश्चिम नौदल कमांडच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 14:18 IST
ताज्या बातम्या