scorecardresearch

मुंबईकरांनो वापरात नसलेले राष्ट्रध्वज जवळच्या पेट्रोल पंपवर जमा करा; इंडियन ऑईचे आवाहन

देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली आहे.

मुंबईकरांनो वापरात नसलेले राष्ट्रध्वज जवळच्या पेट्रोल पंपवर जमा करा; इंडियन ऑईचे आवाहन
संग्रहित

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावला होता. मात्र, १५ ऑगस्टनंतर याच राष्ट्रध्वजाचा अवमान होताना दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून इंडियन ऑइलच्यावतीने राष्ट्रध्वज संकलन मोहीम राबवण्यात येत आहे. वापरात नसलेले ध्वज जवळच्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश जारी केले” CM एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेत दावा, म्हणाले…

देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र, १६ ऑगस्टनंतर राष्ट्रध्वचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही राष्ट्रध्वज संकलन मोहीत राबवत आहे. १६ ऑगस्टनंतर जे राष्ट्रध्वज वापरात नसतील, ते राष्ट्रध्वज जवळच्या पेट्रोल पंपवर जमा करावे. जे ध्वज चांगले असतील, ते आम्ही जतन करून आणि उर्वरित ध्वज सन्मानाने नष्ट करू, असे इंडियन ऑईलच्या मुंबई विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील या उपक्रमाबद्दल ट्वीट करत कौतुक केले आहे. “तिरंग्याचा आदर करा, सन्मानाने तो जतन करा, जमत नसेल तर सन्मानाने परत करा,” असे ट्वीट तिने केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian oil flag collection drive appealed to deposit unused national flags at nearest petrol pump spb

ताज्या बातम्या