माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प १७ ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी विनाशिका आहे. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मुंबईत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, तरीही पाण्याची चिंता नाही; कारण…

Mumbai municipal administration has cancelled the project to build an underground parking lot near Amarsons Park along the coastal road Mumbai
नागरिकांच्या विरोधानंतर सागरी किनारा प्रकल्पालगतचे वाहनतळ गुंडाळले ; चार वाहनतळांपैकी अमरसन्सचा प्रकल्प रद्द
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
Chandivali asalfa five constructions demolished
चांदिवली – असल्फादरम्यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पातील अडथळा दूर, महापालिकेने पाच बांधकामे हटवली
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
Bhau Daji Lad Museum, Devendra Fadnavis, Renovation ,
आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण
Environment Department approves billboards near coastal road
सागरी किनारा मार्गाजवळच्या जाहिरात फलकांना पर्यावरण विभागाची मंजुरी
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात

‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली लघु आणि मध्यम उद्योजकांकडून खरेदी करण्यात आली आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader