मुंबई: हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि प्रादेशिक सुरक्षेच्या कारणास्तव, इंडिगो आणि एअर इंडियाने सौदी अरेबियातील चार शहरांमधून येणारी आणि जाणारी विमानसेवा १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत रद्द केली आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य पूर्व मधील वाढता भू-राजकीय तणाव आणि सौदी अरेबियामधील विमानतळांवर झालेली हूती बंडखोरांची हल्ले यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय विमान कंपन्यांनी आपली सौदी अरेबियाची विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे.
सुरुवातीला रियाद,दम्मम आणि जेहाद या शहरांसाठी २४ ऑक्टोबर पर्यत विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर,७ नोव्हेंबरपर्यत हवाई सेवा स्थगित करण्यात आली होती.आता पुन्हा १४ नोव्हेंबरपर्यत इंडिगो आणि एअर इंडियाने सौदीची विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रद्द केलेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना विमान कंपन्यांकडून मोफत पुनर्बुकिंग किंवा तिकिटाचे पूर्ण परतावा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
