scorecardresearch

Dasara Melava 2022: “…तेव्हा इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप चोरला” राहुल शेवाळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

Dasara Melava 2022 Updates : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Dasara Melava 2022: “…तेव्हा इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप चोरला” राहुल शेवाळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे सातत्याने ‘माझा बाप चोरला” असा आरोप शिंदे गटावर करत आहे. याच आरोपाचा समाचार राहुल शेवाळे यांनी घेतला आहे. मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वारंवार उच्चार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण आमच्यावर वारंवार ‘माझा बाप चोरला’ असा आरोप होतोय.

हेही वाचा- Dasara Melava 2022 : “मैद्याचं पोतं, दाऊदचा हस्तक आणि बारामतीचा…” शहाजीबापू पाटलांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना प्रमुखांना चोरले असा आरोप करणं अत्यंत दुर्दैवी आहे. हिंदुस्तानच्या राजकारणात कधीच कोणत्याच नेत्याने या गोष्टीचा उल्लेख केला नाही. याचं जीवंत उदाहरण म्हणजे १९७० मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींविरोधात जाऊन वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप जवाहरलाल नेहरू चोरला, अशी टीका राहुल शेवाळे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या