जवळपास ९ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. २०१५मध्ये हे प्रकरण बरंच गाजलं होतं. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाचा उलगडा केला होता. सीबीआयनं सखोल तपास करून शीना बोराची हत्या झाल्याचं सिद्ध केलं होतं. त्याच गुन्ह्याखाली तिची आई इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण इंद्राणीनंच शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करणारं पत्र पाठवल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाभोवती गूढ निर्माण झालं आहे. दरम्यान, शीना बोराच्या सापळ्याच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील नोंदी समोर आल्या असून त्यातून याबाबतचं वास्तव स्पष्ट झालं आहे.

इंद्राणीचा नेमका दावा काय?

सध्या तुरुंगात हत्येसाठीची शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला आहे. तुरुंगातल्या एका महिलेने शीना बोराला आपण काश्मीरमध्ये पाहिल्याचं आपल्याला सांगितलं आणि त्याच आधारावर आपण हे पत्र लिहीत असल्याचं इंद्राणीनं म्हटलं आहे. तसेच, शीना बोराचा काश्मीरमध्ये तपास करण्यात यावा, अशी विनंती देखील इंद्राणीनं सीबीआयकडे केली आहे. पत्रासोबत इंद्राणीनं सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, ९ वर्षांपूर्वी हत्या झालेली आणि २०१५मध्ये मृतदेहाची ओळख पटलेली शीना बोरा अचानक जिवंत कशी काय सापडू शकते? असा प्रश्न आता उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे खरंच शीना बोरा जिवंत आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यासंदर्भात २०१५ साली शीना बोराच्या सापळ्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट तपासला असता त्यामधील काही नोंदींवरून या प्रकाराचा उलगडा होऊ शकतो.

फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो?

एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार २०१५ साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या.

२३ वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असंही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं होतं.

नेमकं काय आहे प्रकरण?

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, २०१२मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. इंद्राणी मुखर्जीनं आर्थिक वादामधून तिचा तेव्हाचा पती पीटर मुखर्जी आणि आधीचा पती संजीव खन्ना यांच्यासोबत मिळून शीना बोराची हत्या केली होती. पीटर मुखर्जीला देखील या प्रकरणात अटक झाली होती, मात्र २०२०मध्ये त्याला जामीन मिळाला. चौकशी सुरू असतानाच या दोघांचा घटस्फोट झाला. राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २०१५मध्ये या प्रकरणाचा छडा लावला.

“शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे,” इंद्राणी मुखर्जीचा सीबीआयला पत्र लिहून धक्कादायक दावा

इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याच्याकडे पिस्तुल सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि शीना बोरा प्रकरणाचा उलगडा झाला. श्यामवर रायनंच इंद्राणीनं शीना बोराची हत्या करून तिचा मृतदेह रायगडमध्ये एका ठिकाणी पुरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार तपास आणि चौकशी करताना हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं.

सीबीआय इंद्राणीच्या पत्राची दखल घेईल?

दरम्यान, फॉरेन्सिक अहवालामधून २०१५ साली सापडलेला सापळा शीना बोराचाच असल्याचं जरी स्पष्ट होत असलं, तरी आता इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर न्यायालयीन सुनावणीवेळी काय निर्णय होतो, याविषयी उत्सुकता आहे. तसेच, सीबीआय इंद्राणीच्या या पत्राची कशी दखल घेते, यावर देखील या प्रकरणाचा पुढील तपास अवलंबून असेल.