VIDEO: मुंबईत मद्यधुंद तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

नशेच्या धुंदीत तरुणीकडून पोलीसाला मारहाण

मुंबईतील वरळी येथील पोलीस ठाण्यात एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत पोलीस अधिकाऱयांना शिवीगाळ आणि तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नशेच्या धुंदीत असलेली तरुणी पोलीस ठाण्यातील वस्तुंची तोडफोड आणि पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. यासोबतच एका पोलीस अधिकाऱयाला तिने मारहाण केल्याचेही निदर्शनास येते. एक समवयस्क तरूण तिची अडवणूक करताना व्हिडिओत दिसून येतो. पोलीस देखील तिच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात, पण नशेत धुंद असलेली तरुणी आवेशात पोलिसांच्या अंगावर धावून जाताना दिसून येते. १५ जून रोजी वरळीच्या पोलीस ठाण्यात घडलेला हा प्रकार असून, त्याचा व्हिडिओ आज समोर आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोन तरुण मद्यधुंद तरुणीला आवरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते दोघं तिचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ-

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Inebriated girl slaps policeman creates ruckus in a police station in mumbai

ताज्या बातम्या