scorecardresearch

मुंबई: एक लाख नागरिकांना दिली इन्फ्ल्यूएंझाची मात्रा

२०२२-२३ या वर्षामध्ये राज्यात एक लाख लसींचे वितरण करण्यात आले आहे

Influenza vaccination
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: राज्यात सध्या वाढत असलेल्या ‘एच३ एन२’चा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत असून, २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यात एक लाख लसींचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी ९९ हजार ७७८ जणांना ही मात्रा देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वतीने २०१५ पासून अतिजोखमीच्या व्यक्तीसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्लूएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात येत आहे. सध्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी एक लाख लसीच्या मात्रा खरेदी करून त्याचे मंडळनिहाय वितरण करण्यात आले.

आणखी वाचा- रुग्णसेवा कोलमडली, संपामुळे शस्त्रक्रियांवर परिणाम; बाह्यरुग्ण विभागांतील रुग्णसंख्येत घट

आतापर्यंत यापैकी ९९ हजार ७७८ जणांना इन्फ्ल्यूएंझाची मात्र देण्यात आली आहे. पुणे मंडळात सर्वाधिक ४३ हजार ११५ लसींच्या मात्रा वितरित करण्यात आल्या असून, त्या सर्व लसींच्या मात्रा संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल ठाणे मंडळामध्ये २८ हजार ४०० लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून, त्यातील २८ हजार २५० जणांना मात्रा देण्यात आली आहे. अकोला कोल्हापूर मंडळात सर्वात कमी १४०० लसीच्या मात्रांचे वितरण करण्यात आले आहे. या दोन्ही मंडळांनी सर्व मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नागपूर मंडळ (९८५०), औरंगाबाद मंडळामध्ये (४८००) सर्व मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक मंडळामध्ये ४ हजार ९५० पैकी ४ हजार ९४५ आणि लातूर मंडळामध्ये ६०५० पैकी ५९८३ मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

अडीच लाख रुग्णांची केली तपासणी

इन्फ्ल्यूएंझामध्ये ‘एच१ एन१’ आणि ‘एच३ एन२’ असे दोन उपप्रकार आहेत. त्यामुळे इन्फ्ल्यूएंझाची लागण झालेले रुग्ण शोधून काढण्यासाठी राज्य सरकारच्या विविध रुग्णालयांमधून आतापर्यंत २ लाख ५६ हजार ६२४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५६७ रुग्ण बाधित आढळले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 17:34 IST
ताज्या बातम्या