scorecardresearch

एसटी आरक्षणासाठी राजकीय पक्षांचा पुढाकार; मुंबई महानगरातून ६५० गाडय़ांची मागणी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार ५०० गाडय़ा सोडण्याची घोषणा केली आहे.

एसटी आरक्षणासाठी राजकीय पक्षांचा पुढाकार; मुंबई महानगरातून ६५० गाडय़ांची मागणी
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार ५०० गाडय़ा सोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय पक्षांनीही मुंबई, ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी ६५० गाडय़ांच्या आरक्षणाची मागणी केली आहे. त्यापैकी ५०० गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

 २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०० जादा एसटी गाडय़ांचे आरक्षण २५ जूनपासून सुरू झाले. तर कोकणातून परतीच्या प्रवासासाठी ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात झाली आहे.

सध्या मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात जाणाऱ्या वैयक्तिक आरक्षण आणि गट आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठय़ा प्रमाणावर गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) होत आहे. आतापर्यंत कोकणात जाणाऱ्या २ हजार ७५७ गाडय़ांना प्रतिसाद मिळाला आहे. यापैकी एक हजार २०१ गाडय़ांचे गट आरक्षण झाले असून ८५६ गाडय़ांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे. तर ७०० एसटीचे आरक्षण होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 यंदा राजकीय पक्षांनीही मोठय़ा प्रमाणात एसटी गाडय़ांच्या गट आरक्षणाला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाण्यासह अन्य महापालिकांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी गट आरक्षण करण्यात येत आहे. शिवसेनेने ठाण्यातून ४०० गाडय़ांचे आणि मनसेने १०० गाडय़ांच्या आरक्षणाची मागणी केल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली. तर, मुंबईतूनही भाजपच्या लोकप्रतिनिधीनी १५० गाडय़ांची मागणी केली आहे. या गाडय़ांचे आरक्षणही होत आहे. दक्षिण मुंबईसह शीव, चेंबूर, मुलुंड, वांद्रे, बोरीवली आदी भागांतून या गाडय़ा भाजपमार्फत सोडण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Initiative political parties st reservation demand 650 cars mumbai metropolis ysh

ताज्या बातम्या