सध्या साजऱ्या होत असलेल्या नौदल सप्ताहानिमित्त भारताची सर्वात बलशाली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ मुंबई भेटीवर आली असून सध्या ती मुंबईनजिक समुद्रात उभी आहे. रशियाकडून घेतल्यानंतर दीर्घकाळ प्रतीक्षेत राहिलेली ही युद्धनौका अखेरीस १४ जून २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानंतर ती प्रामुख्याने कारवार नौदल तळावरच होती. नौदल सप्ताहाच्या निमित्ताने ती प्रथमच मुंबईत आली आहे. मात्र मुंबईतील नौदल गोदीत तिच्या बìथगसाठी आवश्यक मोठा धक्का नसल्याने सध्या ती मुंबईनजिक समुद्रात उभी करण्यात आली आहे.