scorecardresearch

Premium

मोठी बातमी! नील सोमय्यांच्या अटकेची शक्यता; किरीट सोमय्यांनंतर कोर्टाने मुलाचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मोठी बातमी! नील सोमय्यांच्या अटकेची शक्यता; किरीट सोमय्यांनंतर कोर्टाने मुलाचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचा मुलगा नील सोमय्यालाही मोठा झटका बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांसोबत नील सोमय्यांच्याही अडचणीत वाढ झाली असून अटकेची टांगती तलवार आहे.

किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नील सोमय्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त होती. मात्र कोर्टाने ही शक्यता फोल ठरवत नील सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे नील सोमय्या यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर सेव्ह विक्रांतच्या नावे लोकांकडून गोळा केलेला मदतनिधी योग्य कामासाठी वापरण्यात आला नसल्याचा आरोप आहे. हा निधी योग्य ठिकाणी न वापरला जाणं ही सोमय्या पिता-पुत्रांची जबाबदारी होती आणि तेच यासाठी जबाबदार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला तपास करायचा असेल तर ते करु शकतात आणि ताबाही मागू शकतात असंही कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना आता मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते. विक्रांत या युद्धनौकेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतची डागडुजी होत आहे, हे समजल्यावर माजी सैनिक भोसले यांची त्यासाठी वर्गणी देण्याची इच्छा झाली.

चर्चगेट येथे २०१३ मध्ये किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे कार्यकर्ते विक्रांत वाचवा असा संदेश छापलेले टी शर्ट परिधान करून युद्धनौका विक्रांत संग्रहालय असे लिहिलेल्या पेटय़ांमधून चर्चगेट स्थानकाबाहेर निधी गोळा करत होते. भोसले  यांनी त्या वेळी दोन हजार रुपये पेटीत जमा केले. पुढे  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकणार असल्याचे त्यांना समजले. जानेवारी २०१४ मध्ये  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकण्यात आले. सर्व भाग अंदाजे ६० कोटी रुपयांना विकण्यात आले, तसेच ते सर्व भाग आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ऑनलाइन लिलावाद्वारे विकत घेतल्याची माहिती  भोसले यांना वर्तमानपत्राद्वारे समजली.

दरम्यान, धिरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. सोमय्या यांनी २०१३-१४ मध्ये विक्रांत या जहाजाच्या डागडुजीसाठी नागरिकांकडून जमा केलेला निधी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये धनादेश अथवा रोख स्वरूपात जमा करण्यात आला का, याबद्दल माहिती विचारली. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नाही, तसेच त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर राज्यपाल कार्यालयातून देण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार  भोसले ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार केली आहे. अंदाजे ५७ कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम सोमय्या यांनी निधी म्हणून जमा केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ins vikrant fund case mumbai sessions court rejects pre arrest bail application of neel somaiya sgy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×