पूरग्रस्तांना विमारक्कम त्वरित द्यावी

जुलै महिन्यात मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा जिल्हयांना पुराचा मोठा फटका बसला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी, पुरामुळे ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले त्यांना विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्रा धरावेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

के रळ व काश्मीरमधील पुराच्या वेळी विमा कंपन्यांना आदेश दिले होते याची आठवण करून देत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी विमा कं पन्यांना तसेच आदेश देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागातील व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याबाबत विमा कंपन्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्य मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११ विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जुलै महिन्यात मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा जिल्हयांना पुराचा मोठा फटका बसला. यामुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सर्व पूरग्रस्त भागांमध्ये महसूल यंत्रणेने पंचनाम्याचे काम सुरू के ले आहे. अनेक दुकाने, वाहने आणि घरे यांचे नुकसान झाल्याने लोक विमा कंपन्यांकडून विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपण आजच काही विमा कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत विमा कंपन्यांनी पंचनाम्यांच्या आधारे एकूण विम्याच्या ५० टक्के रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयास आणि आयआरडीएला योग्य ते निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील जम्मू काश्मीर आणि केरळमधील मोठय़ा पुराच्या वेळेला अशा प्रकारे केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आदेश दिले होते असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

रोगराई पसरू नये म्हणून पूरग्रस्त भागाची स्वछता लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नुकसानीचे दावे निकाली काढण्यासाठी  नुकसान झालेल्या वस्तू आणि वाहने आहे त्या स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही.  त्यामुळे महसूल यंत्रणेने पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे सुस्पष्ट छायाचित्रे काढावीत, महसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्रा धरावीत व  त्यावरून नुकसानग्रस्ताना विम्याची रक्कम देण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले.

व्यापाऱ्यांना स्वस्त कर्जाची गरज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकिं ग व्यवसाय त्वरित सुरू करावा. ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले त्यांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज द्यावे, लोकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी काही महिन्यांची सवलत द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री बँकांना दिल्या. तसेच या मागण्यांचे पत्रही के ंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Insurance flood victims heavy rain due to the flood chief minister uddhav thackeray akp

ताज्या बातम्या