Maharashtra Heavy Rain Alert : संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असल्याचे दिसून येते आहे. काही भागांत पावसाने दाणादाण उडवून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागने आज ( बुधवार १३ जुलै) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसची शक्यता असल्याचा माहिती दिली आहे. सकाळचे काही तास या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसलीकर यांनी ट्वीट करत मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली. ”ताज्या सॅटेलाईट आणि रडारचे निरीक्षण केल्यास मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास या भागांत जोरदार पाऊस पडेल.” असे ट्वीट केएस होसलीकर यांनी केले आहे.

मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

हेही वाचा – महागाईचे ओझे कायम; जूनमध्ये दर ७.०१ टक्क्यांवर ; सलग सहाव्या महिन्यांत सहा टक्क्यांपुढे मजल