अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज आंतरराष्ट्रीय हेरॉईन रॅकेटचा पर्दाफाश करत, दोन परदेशी नागरिकांसह सात जणांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या व चौकशीतून माहिती मिळालेल्या एकूण साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ४८ कोटींच्या जवळपास आहे.

चौकशीत १२ किलो हेरॉईनचा तपास लागला असून, तपासणीत दोन खोक्यांमध्ये लपवलेले दोन किलो हेरॉइन देखील जप्त करण्यात आले आहे. उर्वरीत साठा लवकरच हस्तगत करण्यात आला आहे. तर, या करावाईत अटक करण्यात आलेल्या सात परदेशी नागरिकांमध्ये एक अफ्रिकन व बर्मी नागरिकाचा समावेश आहे.

कुरिअरच्या बॉक्समधून हेरॉईनची तस्करी केली जात असल्याचे यातून उघड झाले. या रॅकेटचा मास्टरमाइंड हा भारता बाहेर राहून, हे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. हे रॅकेट चालवण्यासाठी मास्टरमाइंकडून पैसा व विविध बनवाट कागदपत्रांच्या वापर केला जात होता. वितरण प्रक्रियेच्या नियंत्रणाच्या माध्यमातून हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं.