पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील घोटाळ्याची चौकशी करा

दोन्ही कंपन्या भाजपच्या नेत्यांशी संबंधित असल्याने राऊत यांनी सोमय्या यांच्यावर डाव उलटवण्यासाठी अशी उपरोधिक भाषा वापरल्याची चर्चा आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

संजय राऊत यांचे सोमय्यांना पत्र

मुंबई : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील कं त्राटांमध्ये ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याबाबतची कागदपत्रे आपल्याला पाठवत असून क्रि स्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि आणि आर्क स या कं पन्यांचा त्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. आपण भ्रष्टाचारविरोधातील योद्धे असल्याने व आपण पाठवत असलेल्या प्रकरणांची ईडी तातडीने चौकशी करत असल्याने या प्रकरणातही ईडी चौकशी लावावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पाठवले आहे. या दोन्ही कंपन्या भाजपच्या नेत्यांशी संबंधित असल्याने राऊत यांनी सोमय्या यांच्यावर डाव उलटवण्यासाठी अशी उपरोधिक भाषा वापरल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात एकानंतर एक आरोप करणारे किरीट सोमय्या आणि भाजप यांना प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेने भाजपच्या नेत्यांशी संबंधित घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर काढण्यास सुरुवात के ल्याचे संजय राऊत यांच्या पत्रावरून स्पष्ट होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Investigate the scam in pimpri chinchwad smart city project akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख