मुंबई :  दुर्धर आजारांवरील उपचार व  शस्त्रक्रीया या महागड्या उपचारांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरीबांना संजीवनी आहे. या योजना अंतर्गत च्या रुग्णालयांच्या कामाची व गुणवत्तेची चौकशी स्वंतत्र पथक नेमून करण्यात येणार असून याबाबतचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे अवयव प्रत्यारोपणसारख्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांकरीता महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड घालून संपूर्ण उपचार मोफत करण्यासाठी धोरण तयार करण्यासही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आढावा सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी घेतला. या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू रंगा नायक, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, राज्य हमी विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बोंदरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Touchless of eye check up marathi news
जे.जे. रुग्णालयालात आता नेत्ररुग्णांची स्पर्शविरहित तपासणी, आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नींकडून अद्ययावत उपकरणे उपलब्ध
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
process of getting assistance from the Chief Ministers Relief Fund will be paperless
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया होणार पेपरलेस!

हेही वाचा : टीसच्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा, टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद

रस्ते अपघातामध्ये जखमींना नजीक व उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही रूग्णालयात उपचार घेतलेल्या रूग्णांना योजनेचा लाभ देण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले . तसेच योजनेच्या पोर्टलवर प्राप्त व प्रलंबित असलेल्या सुमारे १०७५ तक्रारीबाबत  तातडीने नोटीसेस देवून खुलासा घेण्यात यावा. तसेच आवश्यकतेप्रमाणे कठोर कारवाईची प्रक्रिया किमान २ आठवड्यात पूर्ण करावी. याबाबत अंमलबजावणी सहाय्य संस्थेकडून प्राप्त तक्रारीवर तातडीने कार्यवाही होत नसल्यास व कारवाईचे प्रस्ताव समितीसमोर सादर केले जात नसल्यास आढावा घेवून अशा संस्थांवर कारवाई करावी. तक्रार निवारणाबाबत नव्याने प्रमाणीत कार्यपद्धती तयार करून कठोर कारवाईच्या तरतूदी कराव्यात असेही निश्चित करण्यात आले.

या योजने अंतर्गत रूग्णालयांच्या कामकाजाची गुणवत्ता तपासणी व मुल्यमापन करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्यालयाकडून स्वतंत्र पथक स्थापन करावे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीवर सनियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील विधीमंडळ सदस्यांचा समावेश असलेली संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली.

हेही वाचा : दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ

आयुष्मान कार्डच्या १०० टक्के वितरणाकरिता तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राष्ट्रीय सुचना व विज्ञान केंद्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाची आरोग्य विभागासोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे. सध्या योजनेनुसार १३५६ उपचार पद्धती आहे. या पद्धतींचा आढावा घेवून त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या उपचार पद्धतीपैकी आवश्यक उपचारांचा समावेश करणे, सध्याच्या उपचार पद्धतीत बदल किंवा सुधारणा करणे, नवीन उपचार पद्धतींचा समावेश, शासकीय रूग्णालयांच्या राखीव प्रक्रियापैकी काही उपचार आवश्यकतेप्रमाणे खाजगी रूग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले. आरोग्य विभागातील सर्व योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता जिल्हास्तरावर स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार करण्यात यावी. धर्मादाय रूग्णालये आणि शासकीय जमीन नाममात्र अथवा सवलतीच्या दराने दिलेल्या नामांकित रूग्णालयांना योजनेत समाविष्ट करून घेण्याकरीता प्रवृत्त करण्यासही त्यांनी सांगितले.  

Story img Loader