सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून जावेद अहमद यांची नियुक्ती

आता जावेद अहमद यांनी सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते या पदाची सूत्रे हाती घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रीय गुप्तचर विभागातील वरिष्ठ अतिरिक्त पोलीस महासंलक दत्ता पडसगिकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी ते गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. जावेद अहमद हे ३९ वे पोलीस आयुक्त ठरले होते. आता जावेद अहमद यांनी सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते या पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यामुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पडसगिरकर यांचे नाव मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या चर्चेत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ips javed ahmad appointed indian envoy to saudi arabia

ताज्या बातम्या