‘फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपी करणार की नाही?’

गुन्हा रद्द करण्याच्या आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी याचिका केली आहे.

मुंबई : बेकायदा फोन ध्वनीमुद्रित करणे आणि पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्यांशी संबंधित गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आरोपी करणार आहात की नाही याबाबत सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. प्रकरणाचा तपास कुठल्या टप्प्यात आहे हेही सांगण्याचे आदेश न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने या वेळी सरकारला दिले.

गुन्हा रद्द करण्याच्या आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी याचिका केली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शुक्ला यांना आरोपी बनवण्यात आले नसल्याचे सांगणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्राकडे शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

त्यावर शुक्ला यांना या प्रकरणी अद्याप आरोपी बनवण्यात आले नसले तरी गोपनीय आणि संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा तपास केला जात असल्याचे राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. शुक्ला यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही आणि त्यांना आरोपी बनवण्याचा हेतू नसेल तर या याचिकेवर सुनावणी घेणे म्हणजे न्यायालयाचा वेळ घालवण्यासारखे असेल, असे न्यायालयाने नमूद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ips rashmi shukla be accused phone tapping case phone racket case akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या