scorecardresearch

Premium

वरळी बीडीडी प्रकल्पात सामान्यांना सोडतीतून घरे मिळणे कठीण!

वरळी येथील बीडीडी चाळ प्रकल्पातील चटईक्षेत्रफळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचे निश्चित झाले असून याबाबत सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कुशमेन अँड वेकफिल्ड कंपनीचा अहवाल सादर झाल्यानंतर निविदा काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

BDD chawl
चटईक्षेत्रफळ विक्रीची प्रक्रिया सुरू (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळ प्रकल्पातील चटईक्षेत्रफळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचे निश्चित झाले असून याबाबत सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कुशमेन अँड वेकफिल्ड कंपनीचा अहवाल सादर झाल्यानंतर निविदा काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकल्पात वरळी प्रकल्पात सामान्यांसाठी सोडतीत घरे उपलब्ध होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र ना. म. जोशी मार्ग व नायगाव प्रकल्पात सामान्यांसाठी घरे उपलब्ध होतील, असा दावा मुंबई गृहनिर्माण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

Nirmala Sitharaman asserted that the government has succeeded in delivering social schemes to the intended beneficiaries
सामाजिक योजना इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश – सीतारामन
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले
Street Food Zone Pune Municipal corporation street vendors committee marathi news
पुण्यात खाऊ गल्लीसाठी महापालिकेचे नवे धोरण

बीडीडी चाळ पुनर्विकासाची मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना रोवली गेली. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाने वेग घेतला आहे. प्रकल्पाचे याआधीचे सल्लागार नाईट फ्रँक यांच्याऐवजी आता कुशमेन अँड वेकफिल्ड यांची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीमार्फत चटईक्षेत्रफळ विक्रीतून म्हाडाला अधिकाधिक फायदा कसा होईल, याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. याबाबत या महिन्याअखेरीस सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-घरांचा साठा रोखणारा ‘म्हाडा’ निर्णय रद्द करण्याचा गृहनिर्माण विभागाचा प्रस्ताव

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वरळी येथील प्रकल्पात सुधारणा सुचविण्यात आल्याने प्रत्यक्षात प्रकल्पाला सुरुवात होऊ शकली नाही. त्यामुळे खर्चातही वाढ झाली. म्हाडाच्या लेखाधिकारी विभागाने तयार केलेल्या एका अहवालानुसार, जून २०२२ पर्यंत ४२ ते ४४ हजार कोटी खर्च अपेक्षित होता. या खर्चात प्रत्येक वर्षी किमान दहा टक्के वाढ प्रस्तावीत करण्यात आली आहे. या प्रकल्पातील फक्त पुनर्वसनातील इमारतींसाठी १६ हजार २०६ कोटी आवश्यक असून म्हाडाची तेवढी आर्थिक क्षमता नसल्यामुळे चटईक्षेत्रफळ विक्री हाच पर्याय असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पुनर्वसन इमारतींचा खर्च : १६ हजार २०६ कोटी – वरळी (११ हजार ६३२ कोटी), नायगाव (२२९५ कोटी ) आणि ना. म. जोशी मार्ग (२२७८ कोटी)

विक्रीच्या इमारतींचा खर्च : १९ हजार ४०४ कोटी – वरळी (१३ हजार ७१० कोटी), नायगाव (३१७० कोटी) आणि ना. म. जोशी मार्ग (२३१७ कोटी)

चटईक्षेत्रफळ विक्रीतून मिळणारी रक्कम : २५ हजार ७७२ कोटी – वरळी (१६ हजार २०६), नायगाव (पाच हजार ६९२ कोटी) आणि ना. म. जोशी मार्ग (३४८८ कोटी)

(म्हाडाच्या लेखाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार माहिती उपलब्ध. प्रति चौरस मीटर अडीच लाख रुपये असा किमान दर गृहित धरण्यात आला आहे.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is difficult for common people to get houses through lottery in worli bdd project mumbai print news mrj

First published on: 08-09-2023 at 16:38 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×