‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’चा ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश

‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा भारतात २ नोव्हेंबर २०२१ रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे कथानक ९० च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.

मुंबई : टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ आणि  प्रियदर्शन दिग्दर्शित ह्यमरक्करह्ण या दाक्षिणात्य चित्रपटांचा ९४ व्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश झाला आहे. जगभरातील २७६ चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत आहेत. या यादीत ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ चित्रपटांचाही समावेश आहे.

‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा भारतात २ नोव्हेंबर २०२१ रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे कथानक ९० च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.  प्रदर्शनानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजकीय वादालाही या चित्रपटाला तोंड द्यावे लागले होते. तमिळनाडूतील आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची ही कथा आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचाही ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत समावेश झाला आहे. खुल्या विभागात निवड झालेल्या २७६ चित्रपटांची यादी ऑस्करच्या संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी ८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jai bhim and markar enter the oscars akp

Next Story
अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करणे बेकायदा नसल्याचा निर्वाळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी